शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

डुक्कराला कळली गाढवाची चव! भरपाईच्या रकमेत पाचपटीने फरक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2023 19:31 IST

गाढवाच्या मृत्यूनंतर २० हजारांची भरपाई मिळणार असताना डुक्करासाठी मात्र फक्त ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने २०२३  ते २०२५ पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या जनावरांसाठी भरपाईची रक्कम निश्चित केली आहे. गाढवाच्या मृत्यूनंतर २० हजारांची भरपाई मिळणार असताना डुक्करासाठी मात्र फक्त ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. तर राज्य शासनाच्या या निकषांमध्ये कोंबडीही ‘पकपक’ करत शंभराचा भाव घेऊन बसली आहे.

राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीत जनावरे मृत्यूमुखी पडल्यास भरपाई देण्यासाठी आगामी तीन वर्षांसाठी संहिता केली आहे. विशिष्ट निकषाच्या आधारावर मदतीची रकम दिली जाणार आहे.त्यात म्हैस व गायीसाठी सर्वाधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ उंट, घोडा व बैलांना प्राधान्य दिले आहे. राज्य शासनाच्या मदतीच्या निकषात कोंबडीही जिंकली आहे. डुक्कर,मेंढी, बकरीसाठी मात्र ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. ही मदत मात्र उत्पादनक्षम जनावरांपुरतीच मर्यादीत राहणार आहे. दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी जनावरांच्या मृत्यूनंतर दिली जाणार मदत ही प्रतिकुटूंबानुसार निश्चीत केली जाणार आहे.

मासळीही दहा हजारांच्या जाळ्यातअल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मत्सबीज शेतीसाठीही तरतूद करण्यात आली आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या मत्सबीज शेतीला प्रतिहेक्टर १० हजार रुपयांची नुकसान भरपाई करण्यात आली आहे. मात्र राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनेतून, अनुदानातून आणि मदतीतून मत्सबीज शेती करणाऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

माणसांपेक्षा जनावरे बरी...या आपत्तीत दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीत  संसार बुडाला असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास आणि घर पूर्णत: कोसळल्यास घरगुती भांडी आणि वस्तुंसाठी प्रतिकुटूंब ५ हजारांची मदत दिली जाणार आहे. त्यात नुकसानीपोटी व भांड्यांसाठी प्रत्येकी अडिच हजारांची तरतूद केली आहे. या मदतीचा आकडा पाहिल्यावर माणसांपेक्षा जनावरेच बरी म्हणावे लागत आहे.

जनावरांसाठी केलेली मदतीची तरतूदरकम-                  जनावर३७५००-     म्हैस, गाय, उंट, याक४०००-       मेंढी, बकरी, डुक्कर३२०००-     उंट, घोडा, बैल२००००-    वासरु, गाढव, खेचर१००-        कोंबडी

टॅग्स :Jalgaonजळगाव