शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२६ बोटांच्या बाळाला मातेने दिला जन्म! वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 11:19 IST

आतापर्यंत आपण २१ किंवा २२बोटे असलेले मुले जन्माला आली असल्याचे ऐकले असेल.  

वासुदेव सरोदे

फैजपूर जि. जळगाव : आतापर्यंत आपण २१ किंवा २२बोटे असलेले मुले जन्माला आली असल्याचे ऐकले असेल.  न्हावी ता. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल २६ बोटांच्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही  हाताला एक- एक तर दोन्ही  पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत.  बाळ व बाळाची आई सुखरूप आहेत.  ही वैद्यकीय इतिहासातील  दुर्मिळ घटना असल्याचे अनेक डॉक्टरांचे मत आहे. 

मध्य प्रदेशातील झिरन्या जि. खरगोन येथील रहिवासी असलेल्या ज्योती बारेला या २० वर्षीय  महिलेला  शनिवारी मध्यरात्री न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने गरोदर मातेची वैद्यकीय तपासणी केली व परिश्रम घेऊन ज्योती बारेला याची  पहाटे ३:३२मिनिटांनी यशस्वी प्रसूती केली. 

 जन्माला आलेल्या या बाळाला पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले कारण या बाळाच्या हातापायाला तब्बल २६ बोटे होती. सामान्यतः हातापायाचे मिळून २० बोटे असतात मात्र हे बाळ चक्क २६ बोटांचे आहे. 

या नवजात बालकाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी सहा बोटे व दोन्ही पायाला प्रत्येकी सात बोटे असल्याने सर्वच अचंबित झाले. या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.  सद्यस्थितीत माता व बालक या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे. न्हावी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळले, परिचारिका कोमल आदिवाले, सुमित बारसे, सरला परदेशी, पौर्णिमा कोळंबे, अरुण पाटील यांनी या महिलेच्या सुखरुप प्रसूतीसाठी परिश्रम घेतले.

दुर्मिळ घटना

आतापर्यंत २१-२२ ते २४ बोटांचे बाळ जन्माला आल्याचे ऐकून  आहे.  तब्बल २६ बोटांचे बाळ जन्माला येणे ही वैद्यकीय इतिहासातील अतिशय दुर्मिळ घटना आहे,असे मत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ, कौस्तुभ तळले व सावदा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश चौधरी यांनी व्यक्त केले.