शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जनक्षोभ नसल्याचे दाखविण्याचा भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा खटाटोप

By ajay.patil | Updated: March 29, 2023 17:52 IST

कार्यकर्त्यांचा विरोध डावलत युतीवर भर : ‘मविआ’ला टक्कर देण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही युतीची तयारी

जळगाव : ९ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर राजकीय गणितं पूर्णपणे बदलली आहेत. अशा वेळेस राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीद्वारे सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गट व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पहिल्यांदाच राजकीय परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वतंत्र लढले तर समोर ‘मविआ’ला शिंदे गट व भाजपच्या मतविभागणीचा फायदा होऊ शकतो. त्यामुळेच भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांचा आग्रह युतीवर दिसून येत आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. २०१९ मध्ये भाजप व शिवसेना एकत्र निवडणूक लढली. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेससोबत जाऊन आघाडी करीत सत्ता काबीज केली. त्यानंतर अडीच वर्षांतच शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करीत, भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे या राजकारणाबाबत जनसामान्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकांची तयारी करीत असताना, जर नागरिकांच्या नाराजीचा सामना एखाद्या पक्षाला करावा लागला तर तीच स्थिती विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कायम राहण्याची भीती आहे. एकीकडे महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवीत असताना, भाजप व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत.

कसब्यातील पराभवानंतर युतीसाठीच प्रयत्न

१. राज्यातील सत्तांतरानंतर चिंचवड व कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला कसब्याची जागा गमवावी लागली. तर चिंचवडला देखील ‘मविआ’कडून तगडी टक्कर देण्यात आली. कसब्याचा पराभवामुळे राज्यातील भाजप व शिवसेना शिंदे गटाचे नेते सतर्क झाले आहेत.२. आता राज्यातील २५७ बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात जळगावातील १२ बाजार समित्यांचा समावेश आहे. भाजपच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधत युती न करण्याची विनंती केली. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी युती करण्यावरच भर दिला.३. जर युती न करताच निवडणुका लढल्यास, भाजप व शिंदे गटाची मतविभागणी होईल. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाल्यास, बाजार समित्यांवर ‘मविआ’ला संधी मिळू शकते. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राज्यात भाजप व शिंदे गटाविरुद्ध जनक्षोभ असल्याचे चित्र उभे राहू शकते. त्यामुळे हे चित्र टाळण्यासाठी भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांकडून बाजार समितीसारख्या छोट्या निवडणुकीतही युतीचा नारा दिला जात आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे