शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चर्चाच जोरदार, झाकली मूठ गुपिताची; मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी ‘हवाई’ दौरा!

By अमित महाबळ | Updated: September 11, 2023 15:09 IST

आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे, तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

जळगाव : राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटले असून, मंगळवारी (दि. १२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. संभाव्य दौऱ्यानुसार, ते विमानाने जळगावला येतील आणि येथून हेलिकॉप्टरने पाचोऱ्याकडे रवाना होतील. त्यांनी ३० किमी अंतरासाठी हवाई मार्ग निवडला आहे. त्याची जनतेत चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे, तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

‘शासन आपल्या दारी’ या तालुकास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा संभाव्य दौरा प्रशासानाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ते जळगावला विमानाने येणार असून, विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने पाचोऱ्याला रवाना होणार आहेत. त्यांना रस्त्याने जाण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, त्याचा विचार करण्यात आलेला नाही. अशात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटले असून, त्याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील नियोजनाशी जोडला जात आहे.

उगाच रिस्क नको म्हणून?कोणतीही रिस्क नको म्हणून म्हणून विमानतळावरूनच ते थेट पाचोऱ्यातील जातील. रस्त्याने गेले असते, तर त्यांना अर्धा तास लागला असता, पण संपूर्ण मार्गावर बंदोबस्त ठेवण्याची, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क राहण्याचे मोठे काम पोलिसांना लागले असते. हवाई मार्ग म्हटला म्हणजे हा ताण हलका होणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

असा आहे मार्गमात्र, पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किशोर पाटील यांनी या दौऱ्यात जळगाव ते पाचोरा हा रस्तामार्ग टाळण्यामागील चर्चा फेटाळून लावली आहे. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री विमानाने जळगावला येतील. तेथून ते हेलिकॉप्टरने नांद्रा-पाचोरा रस्त्यावरील हडसन या ठिकाणी उतरतील. वाहनाने पाचोऱ्यात आल्यावर त्यांच्या उपस्थितीत दुपारी १२:३० वाजता कार्यक्रम सुरू होईल. दोन वाजेपूर्वी हा कार्यक्रम संपेल, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

- मुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतर आमदार किशोर पाटील यांच्याकडे नवीन फॅक्टरीचे उद्घाटन व जेवण आहे. ते झाल्यावर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनेच पुढील प्रवासासाठी जळगावला रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार म्हणतात...मुख्यमंत्र्यांना जळगावहून हेलिकॉप्टरने यायला १० ते १५ मिनिटे लागतील. यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवणार नाही. निवेदन देण्यास व भेटण्यास इच्छुक नसतील. रस्त्याने आले असते तर अर्धा तास लागला असता. वेळ वाचावा म्हणून ते हेलिकॉप्टरने येत आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगावPoliticsराजकारण