शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने तीन ठिकाणी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:31 IST

११ हजार रुग्णांसाठी व्यवस्था सुरु : मोहाडी महिला रुग्णालय, इकरा व देवकर अभियांत्रिकीत पाहणी

जळगाव : कोरोनाचा दिवसेंदिवस होणारा उद्रेक, वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता आगामी काळात ११ हजार कोरोना रुग्ण होतील, ही शक्यता लक्षात घेऊन मोहाडी येथील शासकीय महिला रुग्ण, गुलाबराव देवकर अभियांत्रिकी व इकरा महाविद्यालयही अधिग्रहीत करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी शुक्रवारी पाहणी केली.

मोहाडी येथील रूग्णालयाचे काम काहीच दिवसात आटोपून हे रुग्णालय आता सुरु होणार आहे. दि. १२ जुलैपर्यंत ८ हजार रुग्ण होतील, असा अंदाज केंद्रीय समितीसमोर वर्तविण्यात आला होता़ त्यादृष्टीने नियोजन करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.मोहाडी येथे उभारण्यात येत असलेल्या महिला रुग्णालयाचा विषय प्रलंबित होता, मात्र, हा विषय लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत़ यासह गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय व इकरा महाविद्यालात नॉन कोविडसाठी काही सुविधा होऊ शकते का याची चाचपणी करण्यात आली़रुग्णसंख्या वाढणार, ही शक्यता गृहीत धरून आतापासूनच आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.लक्षणे नसलेलेही खासगीत़़़ अधिकारीही अवाक्काही डॉक्टर्स व अधिकारी गुरूवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गणपती रुग्णालयाच्या बाहेर थांबून होते़ त्यावेळी एका रुग्णवाहिकेतून एक जण थेट चालत चालत रुग्णालयात बिनधास्त जात असल्याच पाहत डॉक्टरांनी त्याला हटकले व विचारणा केली तुम्ही कोण तर आपण रुग्ण असल्याचे त्या व्यक्तिने सांगताच अधिकारी अवाक् झाल़े तुला कोणी पाठविले याची विचारणा त्याला केल्यानंतर त्याने रुग्णवहिका चालकाचे नाव सांगितले़ रुग्णवाहिका चालकाने रुग्णालयाचे नाव सांगितले़ ज्या रुग्णाला लक्षणे नाहीत, असे रुग्य कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हायला पाहिजे मग हा रुग्ण गणपती रुग्णालयात आला कसा? असा सवाल अधिकाऱ्यांना पडला होता़ रुग्णांकडून पैसे घेऊन अशा प्रकारे एजंट तर सक्रिय नाही ना?असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़खासगीचे बिल ४० लाखजळगावातील एका खासगी रुग्णालयाने कोरोना तपासणीचे बिल तब्बल ४० लाख रुपये काढल्याचा एक प्रकार समोर आला आहे़ हे रुग्णालय अधिग्रहीत करण्यात आले होते़ मात्र, त्याबाबतचा निर्णय पूर्णत: झालेला नसल्याने या रुग्णालयात खासगी तत्त्वावरच रुग्णांची तपासणी होत आहे़ मात्र, अव्वाच्या सव्वा बिलामुळे प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे़मृत्यूदर घटलागेल्या आठवड्यात ८ टक्क्यांवर गेलेला मृत्यूदर रुग्ण वाढल्याने ७ ़ ३ टक्क्यांवर आलेला आहे़ मात्र, एका दिवसात होणारे मृत्यू मात्र, थांबविणे आताही शक्य झालेले नाही़ रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढल्याने हा दर घटला आहे़ शुक्रवारीही ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली़आकडेवारी अपडेट होईनाशासनाच्या कोविड पोर्टलवर चार ते पाच दिवस बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारीच अपडेट होत नसल्याचे सामान्य रुग्णालय प्रशासनाची डोकदुखी वाढली आहे़ वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका, गणपती या रुग्णालयातून बरे झालेल्यांची आकडेवारी अपडेट होत नसल्याने गोंधळ वाढल्याचे चित्र आहे़ महापालिकेकडे दीडशे रुग्णांपर्यंतची आकडेवारी टाकली जात नाही़ त्यामुळे ती प्रलंबित राहत आहेत़जिल्हा परिषदेत सहाय्यक व समुपदेशन केंद्रकोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत स्थानिक पातळीवर काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांसाठी सहाय्यक व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद््घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याकरीता नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.असुविधांमुळे दर्जा काढण्याची तयारीशासनाने अधिग्रहीत केलेल्या दोन खासगी रुग्णालयांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत़ हव्या त्या सुविधा त्या ठिकाणी नाहीत, शिवाय त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग हे शासकीय तसेच आयएमचे खासगी डॉक्टर्स आहेत़ अशा स्थितीत या रुग्णालयांबाबत प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे़ आगामी काळात त्यांचा हा कोविडचा दर्जाच काढून घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे़ विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे़असे रुग्ण़़़ असे नियोजनजिल्ह्यात रुग्ण वाढीची शक्यता आहे़ त्यात सद्यस्थितीचे बरे होण्याचे प्रमाण बघता ५ हजार रुग्ण बरे होतील़ उर्वरित तीन हजार रुग्णांमध्ये ७० टक्के रुग्णांमध्ये कमी लक्षणे आढळतील़ उर्वरित ३० टक्के रुग्णांमध्ये मॉडरेट आणि गंभीर आणि अतिगंभीर असे रुग्ण असतील़ या रुग्णांची व्यवस्था डेडिकेकेट कोविड हॉस्पीटलमध्ये होईल़ आज जी परिस्थिती आहेत तीच परिस्थिती पुढे राहिल, तपासण्या वाढल्याने रुग्ण वाढतील ही शक्यता बघून नियोजन करण्यात येत आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव