शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फरकांड्याच्या जवानाकडून दहशतवाद्याचा खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 20:48 IST

जम्मू ते श्रीनगर महामार्गावर जैशच्या अतिरेक्यांंनी अचानक फायरिंग केल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात एका अतिरेक्याचा फरकांडे येथील अरुण दिलीप पाटील या जवानाने खातमा केला आहे.

ठळक मुद्देअरुण पाटील या जवानाने केला जीवाची बाजी लावून तीनपैकी एकाचा खात्मा महानिदेशकांनी मेडल देऊन केला सत्कारफरकांडेवासीयांची छाती अभिमानाने फुलली

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : जम्मू ते श्रीनगर महामार्गावर जैशच्या अतिरेक्यांंनी अचानक फायरिंग केल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात एका अतिरेक्याचा फरकांडे येथील अरुण दिलीप पाटील या जवानाने खातमा केला आहे. दि.१ रोजी सीआरपीएफचे महानिदेशक डॉ.ए.पी.माहेश्वरी यांनी अरुणला मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.याबाबत प्रत्यक्ष अरुण पाटील या जवानाने दिलेली माहिती अशी की, दि. ३१ रोजी पहाटे पाचला जे.के. पासिंगच्या एका ट्रकला राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या बनटोल प्लाझावर स्थानिक पोलिसांनी चेकिंगसाठी अडवले. पण त्या ट्रकमध्ये लपलेल्या चार आतंकवाद्यानी जम्मू काश्मीरच्या पोलिसावर गोळीबार सुरू केल्याने तो जखमी झाला. आम्ही होतो त्या दिशेने पळत आला. तो पळत येताना आमच्या वरिष्ठ सहकाऱ्याने पाहिले व लागलीच आम्हाला सूचना केल्या. आम्ही क्षणाचाही विलंबन करता ट्रकच्या दिशेने फायरिंग सुरू केली. ट्रकमध्ये एकूण चार अतिरेकी होते. त्यात दोन मारले गेले, तर दोन जंगलात पळून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्च आँपरेशन सुरू केले. आमचे दोन ड्रोन या दोन अतिरेक्यांनी पाडले. परंतु पळून जाताना दोघांपैकी एक आमच्या गोळीबारात जखमी झाला होता. त्याचे रक्त वहात असल्याने त्या मार्गावरुन आम्ही पुढे सरकत असताना एक अतिरेकी आमच्या दिशेने गोळीबार करणार तोच त्याला माझ्या गोळीने कंठस्नान करण्यात मी यशस्वी ठरलो. दुसरा जखमी जिवंत पकडला आहे, अशी आंखो देखी माहिती अरुणने दिली.हे आॅॅपरेशन यशस्वी केल्याने सीआरपीएफच्या महानिदेशकांनी या आॅपरेशनमधील सहभागी सर्व जवानांना शनिवारी भोजनाची मेजवानी दिली. मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.अरुण हा फरकांडे येथील दिलीप पाटील यांच्या सुपुत्र आहे. ३२ वर्षांचा हा धाडशी तरुण २००७ साली सैन्यात भरती झालेला आहे. त्याच्या या धाडशी कामगिरीने फरकांडेवासीय गावाच्या सुपुत्राच्या कामगिरीसाठी गर्व व्यक्त करीत आहेत.