वासेफ पटेलभुसावळ : शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. नागरिकांना पायी चालण्यासह वाहने चालवण्यात मोठी कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या घरालगत अंतर्गत रस्त्यांची तुलनात्मक स्थिती ठीक आहे. ज्यांना नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी झुकते माप दिले त्यांनीच नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र रस्त्याच्या आजच्या स्थितीवरून दिसून येत आहे.भुसावळ शहराचा रस्त्यांचा विकास कोरोना काळात क्वारंटाईन तर नाही झाला ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील रस्त्यांची बिकट अवस्थेत या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शनिवारी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा सईदा बी शेख शफी, सत्ताधारी पक्षाचे गटनेता हाजी मुन्ना तेली यांच्या निवासस्थानासमोर पाहणी केली.आमदार संजय सावकारे यांच्या घरासमोर गुळगुळीत रस्ता दिसून आला. अगदी पहिल्या वळणावर भूमिपुत्र चौकात रस्त्याची अत्यंत भयावह स्थिती आहे. याशिवाय नगराध्यक्ष रमण भोळे उपनगराध्यक्ष सईदा बी शेख शफी, सत्ताधारी पक्षाचे गटनेता मुन्ना तेली यांच्या घरासमोरील रस्त्यांची परिस्थितीही योग्य नाहीच.अमृत योजनेमुळे शहरातील मुख्य रस्ते जळगाव रोड, यावल रोड, जामनेर रोड यासह अंतर्गत रस्त्यांची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. नागरिकांना वाहने चालवणे तर दूरच पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. दरवेळी थुंकी लावून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येते. मात्र अगदी एका पावसातच ‘जैसे थे’ स्थिती होऊन जाते.आमदार संजय सावकारे राहार असलेल्या जामनेर रोडलगत असलेल्या प्रोफेसर कॉलनी, भूमिपुत्र चौकापर्यंत रस्त्यांची अत्यंत विदारक स्थिती आहे. सावकारे यांच्या घराजवळची गल्ली चकचकीत आहे. परिसरात इतर रस्त्यांची परिस्थिती विदारक असल्याचे पाहणीत दिसून आले.नगराध्यक्ष रमण भोळे यांचे जळगाव रोडलगत असलेल्या प्रभाग पाचच्या म्युनिसीपल पार्कमध्ये निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोर जुनाच रस्ता असूनल अनेक ठिकाणी खड्डे पडले दिसून आले. अगदी हाकेच्या अंतरावर जळगाव रोडवर रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. कचरापेट्याही तुडुंब भरलेल्या दिसून आल्या.उपनगराध्यक्षा सईदा बी शेख शफी राहात असलेल्या जाममोहल्ला परिसरात अंतर्गत रस्त्याची पाहिजे तशी खास स्थिती दिसली नाही. सभोवतालच्या परिसरात संपूर्णत: खड्डेमय रस्ते, गटारी तुंबलेल्या याशिवाय कचºयाचे ठिकठिकाणी ढीग दिसून आले. जवळच नाला असल्यामुळे नालाही तुडुंब भरलेला दिसून आला.पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे गटनेता हाजी मुन्ना तेली यांचे खडका रोड भागात मुख्य रस्त्यावरच निवासस्थान आहे. या ठिकाणीही रस्त्याची स्थिती ठिक असल्याचे दिसले.लोकांच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल चिड निर्माण झाली असून, आपल्या सभोवतालचा परिसर व रस्ते खड्डेमुक्त केले नाही तर अपेक्षा काय ठेवावी, असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.रस्ते सुधारले तर पुष्पवृष्टी-सोशल मीडियावर ट्रोलशहरात गेल्या चार वर्षांपासून क्वारंटाईनमध्ये गेलेला रस्ता विकास बाहेर कधी येणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. एकदा का तो बाहेर आला तर त्याच शहरातील सर्व नागरिक पुष्पवृष्टीसह स्वागत करणार आहे, असे सोशल मीडियावर नागरिक सत्ताधाऱ्यांना कोरोना काळात क्वारंटाईन शब्दाचा प्रयोग करून ट्रोल करीत आहे.दरम्यान, शहरात गांधी चौक, मॉडर्न रोड ६०-६५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचा अजूनही एक खडा सुद्धा निघालेला नाही. त्या रस्त्याचे संशोधन करून शहरात भविष्यात रस्ते निर्माण करावे, असा तुलनात्मक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पूर्वीच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेने आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. शहर पुढे जातेय की मागे हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.याशिवाय सातत्याने पडत असणाºया पावसामुळे गटारी तुडुंब भरल्या आहेत. यामुळे गटारींमधील घाणदेखील रस्त्यावर साचून असल्याचे दिसून येत आहे.
भुसावळच्या लोकप्रतिनिधींसह अंतर्गत व मुख्य रस्त्यांची भयावह स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:40 IST
भुसावळ शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे.
भुसावळच्या लोकप्रतिनिधींसह अंतर्गत व मुख्य रस्त्यांची भयावह स्थिती
ठळक मुद्देलोकमत रिअॅलिटी चेकसामान्य नागरिकांना रस्त्यामुळे जडल्या अनेक व्याधीरस्त्याचा विकासाचा प्रश्न झाला क्वारंटाईन?