शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जळगाव शिवाजी नगर रेल्वे उड्डानपुलासाठी निविदा प्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 12:37 IST

: तब्बल १०४ वर्षे जुना व अत्यंत जीर्ण झालेला शिवाजीनगर उड्डाण पूल पाडून, त्याच जागी  नवीन उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने निविदा प्रसिद्ध केली आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान उभारण्यात येणाºया चौथ्या रेल्वे लाईनमुळे ही निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून २६ डिसेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत.  या पुलासाठी १८ महिन्यांची मुदत कंत्राटदारास देण्यात आली आहे. मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारित असलेली कामे तत्काळ मार्गी लावल्यास नवीन पूल उभारण्याच्या कामास गती मिळेल व शहरवासीयांना दिलासा मिळेल.

ठळक मुद्दे जळगाव-भुसावळ दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनसाठी तयारी१८ महिन्यात करावे लागणार काम पुर्णजमिनी भूसंपादनासाठी जिल्हाधिका-यांकडे झाली बैठक

 

किशोर पाटील । आॅनलाईन लोकमत

जळगाव दि,२७ : तब्बल १०४ वर्षे जुना व अत्यंत जीर्ण झालेला शिवाजीनगर उड्डाण पूल पाडून, त्याच जागी  नवीन उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने निविदा प्रसिद्ध केली आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान उभारण्यात येणाºया चौथ्या रेल्वे लाईनमुळे ही निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून २६ डिसेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. या पुलासाठी १८ महिन्यांची मुदत कंत्राटदारास देण्यात आली आहे. मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारित असलेली कामे तत्काळ मार्गी लावल्यास नवीन पूल उभारण्याच्या कामास गती मिळेल व शहरवासीयांना दिलासा मिळेल.हा पूल जीर्ण झाल्याने या पुलावरुन अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बसेससह अन्य वाहनांना फेºयांना प्रवास करावा लागत आहे. नवीन पूल उभारल्यास नागरिकांचे हाल थांबतील.चौथ्या रेल्वे लाईनसाठी रेल्वे विभागाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे़ २४ नोव्हेंबर रोजी भूसंपादनाच्या अडचणींबाबत शेतकरी, रेल्वे विभागातील अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली़  आता चौथ्या मार्गासाठी शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा पूल व्हावा यासाठी ‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. रेल्वे विभाग त्यांच्या हद्दीतीलच पुलाचे काम करणार असून त्याच कामासाठी ही निविदा प्रसिध्द करण्यात आली़ महापालिकेच्या हद्दीतील पुलाला जोडण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वतंत्र निविदा काढावी लागणार आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापर्यंत निविदा प्रसिध्द करण्यात आलेली नाही.दोन्ही विभागाच्या निविदा अंतिम झाल्यावर रेल्वे विभागाकडून कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी घ्यावी लागणार आहे़ यानंतर महापालिकेची लेखी परवानगी घेवून हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अभियंता रोहित थावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

८ कोटी ६४ लाखांची निविदा...मध्य रेल्वेकडून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी ८ कोटी ६४ लाख ८ हजार ६८९़ २७ रुपये किमतीची ई- निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे़ २६ डिसेंबर ही निविदेची अंतिम मुदत असून याचदिवशी निविदा उघडण्यात येणार आहे़ १८ महिन्यांमध्ये मक्तेदाराला काम पूर्ण करावे लागणार आहे़