जळगाव : जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, धरणगाव, फैजपूर, जामनेर, चोपडा, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 92 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 82 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये आठ व्यक्ती भुसावळ येथील तर दोन व्यक्ती या जळगाव शहरातील आहेत. भुसावळ येथील व्यक्तीमध्ये तलाठी कॉलनी, भज्जेगल्ली, जाम मोहल्ला, लाल बिल्डींग, आयेशा कॉलनी, खडकारोड याठिकाणच्या 3 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. तर सिंधी कॉलनी, जळगाव येथील एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 209 इतकी झाली असून त्यापैकी एकोणतीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर पंचवीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 00000
जळगाव जिल्ह्यात आणखी दहा कोरोना रूग्ण, जिल्ह्यात 209 कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:59 IST