शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावात दहा ग्रँम सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:48 IST

गळा आवळून केला भरदिवसा खून

ठळक मुद्देभरदिवसा झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीसहकार राज्यमंत्र्यांसह राजकीय पदाधिकाºयांच्या भेटीअज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी लुट व खुनाचा गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतधरणगाव,दि.१२ : संजय नगर भागातील पाण्याच्या टाकी जवळील रहिवासी मंजुळाबाई शिवाजी महाजन (वय-७२) या वृद्धेचा अज्ञात चोरट्यांनी दहा ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसाठी गळा आवळून व डोक्याला मारुन खून केल्याची घटना १२ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान घडली. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.गुरुवारी सकाळी ९ वाजता मंजूळाबाई यांचा मुलगा साहेबराव हा गॅस हंडी तर सून बाजारात गेली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात घूसून वृध्द महिलेचा गळा आवळला. चोरट्यांनी डोक्यात व उजव्या गालावर जबर मारहाण केल्याने वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर चोरट्याने वृद्धेच्या कानातील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने काढत घटनास्थळावरून पळ काढला. शेजारी राहणारी एक लहान मुलगी ११ वाजेच्या सुमारास घरात गेली असता वृद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर या मुलीने आरडाओरड करीत बाहेर आली. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेबाबत वृद्धेचा मुलगा व सुनेला माहिती दिली. त्यांनी तत्काळ घरी येत आक्रोश केला. मयत मंजुळाबाई यांची मुलगी भोपाळ येथे असल्याने शुक्रवार १३ रोजी सकाळी ९ वा.संजय नगर येथून अंत्ययात्रा निघणार आहे.भरदिवसा झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीभरदिवसा झालेल्या या घटनेमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक़ प्रशांत बच्छाव,चोपडा विभागाचे पो.उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक बी.डी.सोनवणे यांनी भेट दिली. तत्काळ श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. बाजाराचा दिवस असल्याने गल्लीत असलेल्या शांततेचा फायदा चोरट्याने घेत आपला डाव साधला.राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटीया घटनेची माहिती मिळताच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलीम पटेल, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून परिवाराचे सांत्वन केले.अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखलया घटनेसंदर्भात मयत महिलेचा मुलगा साहेबराव शिवाजी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात भादंवि कलम ३९४, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस शिपाई मिलींद सोनार हे करीत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावMurderखून