शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसात ७८१ रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:52 IST

सर्वच तालुक्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणारे अधिक, तीन कोविड सेंटरमध्ये करण्यात आली

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दहा दिवसात अगदीच झपाट्याने वाढली आहे. दहा दिवसात ७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सरासरी ७८ रुग्ण दररोज बरे होऊन घरी जात आहे़ सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात उपचार घेणाºयांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असून ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी मानली जात आहे़जून महिन्यात रुग्णसंख्या अगदीच झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती़ मात्र, दहा दिवसात शेकडो रुग्ण बरे झाल्याने अ‍ॅक्टीव केसेसची संख्या घटल्याने रुग्णालयांचा ताण काहीसा कमी झाला आहे़ डेडिकेटेट कोविड हॉस्पीटल्स, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर या तीन पातळ्यांवर आता रुग्णांची विभागणी करण्यात आली आहे़ जळगावातील शासकीय रुग्णालयात प्रचंड रुग्णांचा भार वाढल्याने गोदावरी रुग्णालयात काही रुग्ण हलविण्यात आले. यासह गणपती व गोल्डसिटी रुग्णालयातही काही रुग्ण उपचार घेत आहेत़ त्यामुळे यंत्रणेचा ताण कमी होत आहे़कोविड रुग्णालयातून ४०६ रुग्ण झाले बरेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संशयित व बाधित असे एकूण २३५१ रुग्ण दाखल झाले होते़ सद्यस्थितीत इथे ११७ बाधित रुग्ण असून एकत्रित या रुग्णालयातून ४०६ रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे़ ही बाब निश्चितच दिलासादायक आहे.जिल्हा देश व राज्याच्या पुढे...काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खालावलेले होते़ अगदी ४४ टक्के असलेले हे प्रमाण गेल्या दहा दिवसात वाढू आता ५९ टक्क्यांवर आलेले आहे़ देशाच्या व राज्याच्या मानाने हे प्रमाण अनुक्रमे चार व दहा टक्क्यांनी अधिक आहे़ देशाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५५ तर राज्याचे प्रमाण हे ४९ टक्के आहे़ दरम्यान, जिल्हाभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भडगाव तालुक्यात सर्वाधिक आहे़सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी रुग्णाला लक्षणे नसतील तर त्याला घरी सोडण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार रुग्णांना घरी सोडले आहे़ यात डॉक्टरांचे प्रयत्न आहेतच़ शिवाय नातेवाईकांचे सहकार्य, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी बरे होण्याचे प्रमाण आपल्याकडे समाधानकारक आहे़ -डॉ़ एऩ एस़ चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव