शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कापूस उत्पादक अडकला फरडच्या मोहात

By ram.jadhav | Updated: January 15, 2018 00:35 IST

दरवाढीने अपेक्षा वाढल्या : कृषी विभागाच्या आदेशाला शेतकºयांचा हरताळ

ठळक मुद्देवाढत्या भावाची लागली आसशासनाच्या मदतीपेक्षा स्वत:च्याच शेतात काहीतरी मिळण्याची अपेक्षापुढील वर्षी फरदड घेण्याचा हाच निर्णय शेतकºयांसाठी त्रासदायक ठरणार आहे

राम जाधवआॅनलाईन लोकमत दि़ १५, जळगाव : यावर्षी अपुºया पावसातही कसाबसा कापसाचा हंगाम आला; मात्र गुलाबी बोंडअळीने कैºया पोखरल्याने कापसाचे उत्पादन घटले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कापसाच्या दरात तेजी येत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी फरदडच्या उत्पनांच्या मोहात अडकला आहे. त्यामुळे शेतात उभे असलेले कपाशीचे पीक कृषी विभागाकडून उपटण्याचे आदेश येऊनही शेतकºयांना उपटण्याची इच्छा होत नसल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणाºया कापसाच्या दराने शेतकºयांना अशा नुकसानीच्या व दुष्काळी परिस्थिती असलेल्या वर्षात उभे पीक काढण्याचेही धाडस होत नाहीये. म्हणूनच खालावणाºया आर्थिक परिस्थितीत आता फरदड घेण्याचा निर्धार जिल्ह्यातील बहुतेक शेतकºयांनी केल्याचे दिसत आहे.बोंडअळीचे संकट वाढणारशेतकºयांचा हा निर्णय त्यांनाच पुढील वर्षासाठी घातक ठरणार आहे. फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीला जास्त काळ जीवन जगता येणार आहे. त्यामुळे या अळीचे जीवनचक्र पूर्ण होऊन पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर या अळीचा प्रादुर्भाव वाढून गुलाबी बोंडअळीचे संकट वाढणार आहे. म्हणूनच कृषी विभागाकडून कपाशीचे पीक लवकरात लवकर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शेतकºयांनी ते जुमानले नाहीत.शेतकºयांकडे पैसाच नाहीवर्षभरापासून मिळणारी कर्जमाफी अजूनही मिळत नाही. काहींना तोकडी रक्कम मिळाली तर अनेकजण अजूनही यादीच्याच प्रतीक्षेत आहेत. त्यातही मिळालेला पैसा विकास सोसायट्या १४ टक्के व्याजदराने जिल्हा बँकेच्या मदतीने लाटण्याच्या कामाला लागलेल्या आहेत़ त्रस्त झालेल्या शेतकºयांकडे आता पर्याय उरलेला नाही, म्हणून जे मिळतील ते आपले असे म्हणून शेतकरी फरदडीच्या कापसाची प्रतीक्षा करीत आहे; मात्र फरदडीच्या या कपाशीचीही सर्व बोंडे अळीग्रस्त झालेली आहेत. यापासून अनेक शेतकरी अद्यापही अनभिज्ञच आहेत. याच अळ्या पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर त्रास देणार आहेत़४गेल्या महिन्यात राज्याच्या कृषी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत शेतकºयांना कपाशीचे पीक उपटण्यासाठी आदेश देण्याचे ठरले होते. त्यानुसार राज्यभर कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना कपाशी उपटण्याचे सांगितले.४त्यानुसार काही शेतकºयांनी कपाशी उपटलीसुद्धा, मात्र त्यातही ज्याच्याकडे काही रब्बी पिके घेण्यासाठी पाण्याची सोय होती, अशाच शेतकºयांनी तत्काळ कपाशीचे पीक काढून गहू, हरभरा, मका, दादर किंवा इतर काही भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली. ज्यांच्याकडे फारशी पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकºयांनी कपाशीची फरदड घेण्याचे ठरवले आहे.शेतकºयांनी फरदडचा कापूस घेण्याच्या नांदात ना पडता लवकरात-लवकर कपाशीवर ग्रामोझोम या औषधाची फवारणी करून मिळेल तो कापूस वेचून घ्यावा. जास्त कालावधीच्या कपाशीच्या वाणाची लागवड करू नये. डिसेंबर महिनाअखेर पर्यंत कपाशीचे पीक संपवावे. शेतात अळीग्रस्त बोंडे ठेवू नये, अशी बोंडे व कपाशी जाळून नष्ट करावी.- बी. डी. जडे, वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ, जळगाव.भाव वाढले आहेत; मात्र यावर्षी मिळणाºया काही हजारोंच्या उत्पन्नासाठी शेतकºयांनी पुढील वर्षीचे लाखोंचे उत्पन्न बुडवू नये. पुढील हंगामात जर कपाशीचे उत्पादन घ्यायचे असेल तर आhttp://www.lokmat.com/akola/bt-cotton-pink-bollworm-attack-cotton-crop/ताच शेतकºयांनी कपाशीचे पीक नष्ट करावे.- अनिल भोकरे कृषी उपसंचालक, जळगाव.या हंगामात कापसाचे उत्पादन घटले, जो आला त्याला ही सुरुवातीला दर मिळाला नाही. त्यामुळे आतातरी जगण्यासाठी काहीतरी दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा असल्याने फरदड घेत आहे़सुधाकर पाटील, शेतकरी वाकोद, ता. जामनेर.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcottonकापूस