शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरत्या साफसफाईने क्रीडा संकुल गजबजू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 22:40 IST

आमदार अनिल पाटील यांनी क्रीडा संकुल तात्पुरते स्वच्छ केल्याने अनेक खेळाडू खेळ खेळू लागले आहेत.

ठळक मुद्देग्राऊंड ऊर्जा देते, जो घरी बसून मोबाईलवर असतो तो निर्जीव राहतो-आ अनिल पाटीलनियोजित क्रीडा संकुलात वाढलेले गवत चार जेसीबीद्वारे तीन दिवस मोहीम राबवून काढले

अमळनेर : आमदार अनिल पाटील यांनी क्रीडा संकुल तात्पुरते स्वच्छ केल्याने अनेक खेळाडू खेळ खेळू लागले आहेत. क्रीडा संकुल गजबजू लागले आहे. यानिमित्त क्रीडा प्रेमींतर्फे आमदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.या क्रीडा संकुलात मोठमोठे गवत उगवल्याने जेसीबीद्वारे ते काढून हे संकुल स्वच्छ करण्यात आले. जेथे चालणेही अवघड होते तेथे साफसफाईमुळे मैदान गजबजून फुटबॉल, कबड्डी, व्हॉलिबॉल, खोखो व क्रिकेट आदी खेळ सुरू झाले आहेत. भविष्यात सरकारकडून निश्चितच निधी आणून हे क्रीडासंकुल पूर्ण करणार आहे, मात्र काही दानशूर क्रीडाप्रेमींनी मदतीचादेखील हात द्यावा, असेही आवाहनही आमदारांनी सत्कार प्रसंगी केले.आमदार पाटील यांनी मारवड रस्त्यावरील नियोजित क्रीडा संकुलात वाढलेले गवत चार जेसीबीद्वारे तीन दिवस मोहीम राबवून काढले. यामुळे या संकुलाचे रूप बदलले आहे. परिणामी असंख्य क्रीडाप्रेमी याकडे आकर्षिले जाऊ लागले आहे. यावेळी जेसीबी उपलब्ध करून देणारे बांधकाम व्यावसायिक धनंजय नथु पाटील, योगेश भरत पाटील, शशिकांत पाटील, धार नगरसेवक शेखा मिस्तरी आदींसह सेवा देणारे आर.बी.इन्फस्ट्रक्चरच्या कामगारांचेदेखील विशेष सत्कार करण्यात आला.मंंचावर माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, नगरसेवक अभिषेक पाटील, तालुका क्रीडा संयोजक एस.पी. वाघ, माजी नगरसेवक विनोद कदम, योगेश पाटील, मेजर राजेंद्र यादव, ज्येष्ठ खेळाडू महादेव शिंदे, मिलिंद शिंदे उपस्थित होते. सुरवातीला संजय पाटील, संदीप सराफ व भाग्यश्री पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत आमदारांच्या कार्याचे कौतुक करून क्रीडा संकुलाबाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या.जो सदैव ग्राउंडवर असतो तो ऊर्जा देणारा असतो, मात्र घरी बसून मोबाईलवर असणारा सदा निर्जीव राहतो, हे क्रीडा संकुल आपले असल्याने ते कायम स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी अधूनमधून खेळाडूंनीच श्रमदान मोहीम राबवून क्रीडा संकुल स्वच्छ ठेवले पाहिजे, असे आवाहन आमदार पाटील यांनी खेळाडूंच्या सत्काराला उत्तर देताना केले.कार्यक्रमास क्रीडाशिक्षक किशोर मोरे, नीलेश विसपुते, महेश माळी, डी.डी.राजपूत, कमलेश मोरे, सॅम शिंगाने, रोहिदास महाजन, मनोरे, के.यु.बागुल,पप्पू चावरीया यासह उद्योजक अलीहुसेन बोहरी, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, किशोर भदाणे, प्रदीप पाटील, सोमचंद संदनशिव, नितीन बोरसे, गुणवंत पाटील, कुंदन निकम, राहुल पाटील, उमाकांत हिरे, पाटील, डबेलकर, यतीन पवार, महेश पाठक आदींसह अनेक खेळाडू उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थीAmalnerअमळनेर