शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST

(डमी ८८२) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तविला होता. ...

(डमी ८८२)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तविला होता. मात्र, जुलैपर्यंत तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसून येत नाही. कारण जुलै महिना उजाळला असतानादेखील पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या पुर्णपणे खोळंबल्या आहेत. त्यात जिल्ह्यात ३० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाअभावी निम्मे क्षेत्रावर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

चोपडा, अमळनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये जून महिन्याचा सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस झाला आहे. तर इतर ठिकाणीदेखील अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्हाभरात पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्यस्थितीत केवळ ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही २० टक्के क्षेत्र हे बागायती कापसाचे आहे. तर उर्वरित १० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू जमिनीवरचे आहे. ज्या भागात सोयाबीनची पेरणी लवकर झाली होती. अशा भागात सोयाबीनचे पीक पुर्णपणे जळून गेले आहे. काही शेतकऱ्यांनी इतरांकडून पाणी घेवून पीके जगवण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक शेतकऱ्यांना यावर्षी दुबार पेरणी करावी लागणार आहे. उडीद व मूग अजूनही तग धरून असले तरी येत्या तीन-चार दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास उडीद-मूग लागवड केलेल्या शेतकऱ्यांवरदेखील दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

तर दुबार पेरणी अटळ

जिल्ह्यात २५ जूननंतर समाधारक म्हणता येईल असाही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात जून महिन्याचा सरासरीपेक्षाही १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. लवकर पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. सध्यस्थितीत मान्सूनला ब्रेक लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, १० जुलैनंतर पाऊस सक्रिय न झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगाम लांबून, दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होणार आहे.

बाजरीचा पेरा वाढणार

जिल्ह्यात दरवर्षी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड होत असते, मात्र यावर्षी सोयाबीन, मूग व उडीद या पिकांना कमी झालेल्या पावसामुळे फटका बसणार असल्याने जिल्ह्यात यंदा बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून यंदा २०० क्विंटल बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. कमी कालावधीत येणारे पीक असून, चाऱ्यासाठी देखील याचा वापर होतो. दरम्यान, सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट होण्याची शक्यता आहे.

चोपडा,अमळनेर तालुक्यात कमी पाऊस

जिल्ह्यात यंदा जून महिन्यात सरासरीच्या १५ टक्के पाऊस कमी झाला आहे. रावेर, यावलसह पाचोरा, तालुक्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असला तरी चोपडा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात यावर्षी जून महिन्याचा एकूण सरासरीपेक्षा तब्बल ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यात ३० जूनपर्यंत केवळ १२ ते १५ टक्केच पाऊस झाला आहे. तसेच पाऊस लांबला तर पेरण्या देखील लांबतील, त्यामुळे खरीप हंगामाच्या उत्पादनावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोट...

जिल्ह्यात काही ठराविक तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये बरा पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून, पाऊस लांबल्यास झालेल्या पेरण्याही वाया जाण्याची भिती आहे. कृषी विभागाकडून दुबार पेरणीसाठी देखील बियाणे उपलब्ध आहे. मात्र, ती वेळ शेतकऱ्यांवर येवू नये अशी आशा आहे.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक,

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

गेल्या वर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाले होते. जुलैपर्यंत शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येईल अशी आशा होती. मात्र, नंतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपुर्ण खरीप हंगाम वाया गेला होता. तर यावर्षी देखील सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. आता सर्व निसर्गावर अवलंबून आहे.

-कैलास जाधव, शेतकरी, फुपनगरी

बियाण्यांचे दर वाढलेले असताना, बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, पावसाअभावी पीक पुन्हा वाया गेले आहे. आता पुन्हा बियाणे घ्यावे लागणार आहे. आता जे पण उत्पन्न येईल त्यात झालेले नुकसान भरून निघाले तरी चालेल. मात्र, पुन्हा निसर्गाने पाठ फिरविली तर मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर कोसळणार आहे.

-रमेश पाटील, शेतकरी, निरुळ.