मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी येथे रोहित्रावर काटेरी झुडूपामुळे तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 08:09 PM2019-07-14T20:09:51+5:302019-07-14T20:11:07+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी येथील विद्युत रोहित्रावर काटेरी झुडूप वाढल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. यामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील ग्रामस्थांना दोन दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे.

Technical failure due to thorny shrub in Rohitra at Patdandi in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी येथे रोहित्रावर काटेरी झुडूपामुळे तांत्रिक बिघाड

मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी येथे रोहित्रावर काटेरी झुडूपामुळे तांत्रिक बिघाड

googlenewsNext
ठळक मुद्दे वॉर्ड क्रमांक एकमध्ये दोन दिवसांपासून वीजपुरवठा ठप्पनागरिक त्रस्ततक्रार करूनही दखल घेईना



मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील पातोंडी येथील विद्युत रोहित्रावर काटेरी झुडूप वाढल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. यामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील ग्रामस्थांना दोन दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे.
काटेरी झुडूप वाढल्याने तांत्रिक बिघाड होऊन वॉर्ड क्रमांक दोनमधील अर्ध्या घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अंतुर्ली वीज केंद्रातील कर्मचाऱ्याकडे ग्रामस्थांनी तक्रार करूनसुद्धा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.
आधीच पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे विषारी प्राणी व कीटकांमुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भरच पडली आहे.
 

Web Title: Technical failure due to thorny shrub in Rohitra at Patdandi in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.