शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानातूनच मानवतेची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 14:19 IST

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर ...

परमात्म्याचे ज्ञानच मानवतेचा खरा धडा शिकवते आणि केवळ विशाल हृदयासोबत मानवता स्थिर व सुरक्षित राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवर क्रोध करणे, मनामध्ये व्देष निर्माण करणे यामुळे मनुष्याचे नुकसान आहे. जसे की, एखादा खेळ खेळण्यासाठी आधी सराव करणे गरजेचे आहे. तरच खेळ चांगल्या तºहेने खेळू शकू. त्याचप्रमाणे अध्यात्म आपल्या जीवनाचा भाग बनेल. तेव्हाच याला व्यवहारात येणारी अध्यात्मिकता म्हणू शकतो.आपणा सर्वांच्या जीवनाचे उद्दीष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न पाहून प्रसन्नता होत आहे. जेव्हा समाजाकडे पाहतो, तेव्हा हीच प्रार्थना येते की, हे प्रभू, मनुष्याचे तन तर दिले आहे; परंतु जीवनदेखील मनुष्यासारखे होऊ देत. ज्याप्रमाणे ऋतु बदलत असतात, त्याचप्रमाणे जीवनात सुख-दु:ख येतात; परंतु जे परमात्म्याच्या नावात रंगलेले आहेत, ते निरंकाराच्या जाणिवेत जीवन जगून सदैव कृतज्ञतेचा भाव व्यतीत करतात. अनेक जण एखादे संकट किवा दु:खसुध्दा ईश्वराची इच्छा समजतात. हा जो निरंकार कणाकणात सामावलेला आहे, याला सहजरुपात प्राप्त करतात. कारण ते निरंकाराशी जुळून राहतात. ज्याप्रमाणे तबला, ढोलकी इतर वाद्ये दिसण्यामध्ये वेगळी असतात; परंतु जे स्वर निघतात, ते एकसारखेच असतात. याचप्रमाणे संतदेखील विविध रुपात भक्ती करतात; परंतु त्याचा भाव एकच असतो.दैनंदिन जीवनातील जबाबदारीचे आपण रोजच पालन करतो. यासोबतच जर अध्यात्माला आपल्या जीवनाचा आधार बनवले, तर मुक्ती प्राप्त होईल. तिथेच सहज अवस्थेचीही प्राप्ती होईल.आजच्या तांत्रिक युगात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला वस्तूंचा सदुपयोग कशाप्रकारे करावा, हेदेखील दर्शविते. आपण वस्तूंचा उपयोग चांगल्या कामासाठीच करावा ना की, कोणाला दु:ख किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी असावा.चाकूचा उपयोग डॉक्टर आणि खुनी दोघेही करतात. एक कोणाला तरी जीवनदान देतो आणि दुसरा कोणाचे तरी जीवन समाप्त करतो.( संकलन - राजकुमार वाणी)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव