शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरच्या शिक्षकाची आग्रा ते दिल्ली धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:36 IST

२३० किमी धावले : जुन्या पेन्शन योजनेसाठी रामलीला मैदानावर मोर्चा

ठळक मुद्देआग्रा ते दिल्ली २३० किमी अंतर धावत जाऊन आंदोलनस्थळी पोहचणारहक्कासाठी गेल्या तीन वर्षांपासून जुनी पेन्शन हक्क संघटना कार्यरतदररोज ५० कि.मी. अंतर करीत आहेत पार

आॅनलाईन लोकमतगोंडगाव, ता. भडगाव, दि.३० : राज्य शासनाने सन २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व राज्य कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केली आहे. पेन्शन पूर्वीप्रमाणे सुरू करावी या मागणीसाठी सोमवार, ३० रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे शासकीय कर्मचारांच्या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुक्ताईनगर येथील प्राथमिक शिक्षक प्रदीप सोनटक्के आग्रा ते दिल्ली २३० किमी अंतर धावत जाऊन आंदोलनस्थळी पोहचणार आहे.अन्यायकारक नवीन पेन्शन योजना रद्द करून हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून जुनी पेन्शन हक्क संघटना कार्य करीत आहे. सोमवार, ३० एप्रिल रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर कर्मचारी आंदोलन करणार आहे. त्यासाठी परभणी येथील भूमिपुत्र व मुक्ताईनगर येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप सोनटक्के हे आग्रा ते दिल्ली हे २३० कि.मी. अंतर धावत जाऊन आंदोलनस्थळी पोहचणार आहे. त्यांच्या या अनोख्या अभियानाची सुरुवात २६ एप्रिल पासून आग्रा येथून झाली आहे. दररोज ते साधारणपणे ५० कि.मी. अंतर पार करत आहे. उन्हातही त्यांचे हे अभियान सुरूच आहे.

जे कर्मचारी मृत पावले आहेत, त्यांच्या कुटुंबाला पेन्शन नसल्यामुळे त्यांना पुढचे जीवन खूपच वाईट परिस्थितीत काढावे लागते. पेन्शन म्हणजे वृद्धापकाळाचा आधार आहे. तो आधार आम्हाला मिळायलाच पाहिजे.-प्रदीप सोनटक्के, शिक्षक, मुक्ताईनगर

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगर