शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या विकासाठी शिक्षकांची ‘दानमूठ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:55 IST

चाळीसगावातील शतकोत्तर आ.बं. विद्यालयाचे रुपडे पालटणार

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव शिक्षण संस्थेला १०९ वर्षांचा शैक्षणिक वारसा असून, शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी आ.बं. विद्यालयाची टुमदार इमारत याची साक्ष देते. याच इमारतीच्या दुरुस्तीसह रंगरंगोटीसाठी शाळेतील शिक्षकांनीच सत्पात्री दानाची ओंजळ रिती केली आहे. याच दानमुठीतून शतकोत्तर वारसा असणाऱ्या इमारतीचे रुपडे पालटणार आहे.संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी इमारतीच्या दुरुस्तीसाठी शिक्षकांना साद घातली. प्रतिसाद म्हणून शिक्षकांनीही काही रक्कम देण्यास सुरुवात केली. सोमवारी नारायणदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत शिक्षकांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले. या वेळी व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र चौधरी, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, आ.बं.मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन अ‍ॅड. प्रदीप अहिराराव, संचालक क.मा.राजपूत आदी उपस्थित होते.शिक्षकांचा ज्ञानयज्ञनारायणदास अग्रवाल यांनी संस्थेची शतकोत्तर वाटचाल शिक्षक सहविचार सभेत मांडतानाच शिक्षकांना इमारतीच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. ‘विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक मानबिंदू’ हे चाळीसगाव शिक्षण संस्थेचे ब्रीद. अग्रवाल व संचालक मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना निवृत्त मुख्याध्यापक उ.भ.काळे, निरखे, मिलिंद देव, प्रमोद येवले, गुलाब बोरसे, के.एन.तडवी, एम.जे. सूर्यवंशी, प्रताप ठाकूर, क्षीरसागर, विद्या सांगळे, व्ही.बी.देवरे, दिलीप जैन, एन.बी.झोपे, रामसिंग राजपूत, शिंदे, भिकन महाजन, अलका शहा आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी मदतीचे धनादेश दिले.गेल्या ४५ वर्षांपासून संस्थेशी निगडित आहे. आ.बं. विद्यालयाची १०० वर्षांपूर्वीची इमारत आम्हाला ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करायची आहे. याच भावनेतून इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. शिक्षकांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येऊन चांगला आदर्श घालून दिला आहे.- नारायणदास अग्रवालअध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, चाळीसगाव शिक्षण संस्था, जि.जळगाव

टॅग्स :educationशैक्षणिकChalisgaonचाळीसगाव