शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात एक गावठी पिस्तुल व दोन रिव्हाल्वरसह तरुण जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:54 IST

गावठी पिस्तुलचे केंद्र असलेल्या उमर्टी येथून एक गावठी पिस्तुल, दोन रिव्हाल्वर व तीन जीवंत काडतूस घेऊन आलेल्या अजयसिंग कल्याणसिंग बर्नाला (वय २१ रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी वैजापुर, ता.चोपडा येथे सापळा लावून ताब्यात घेतले. जळगावला आणल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे एलसीबीची कारवाई  वैजापूर गावात लावला सापळामुख्य सूत्रधाराचा शोध

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११: गावठी पिस्तुलचे केंद्र असलेल्या उमर्टी येथून एक गावठी पिस्तुल, दोन रिव्हाल्वर व तीन जीवंत काडतूस घेऊन आलेल्या अजयसिंग कल्याणसिंग बर्नाला (वय २१ रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी वैजापुर, ता.चोपडा येथे सापळा लावून ताब्यात घेतले. जळगावला आणल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.जळगाव व धुळे जिल्ह्यात उमर्टी येथूनच चोपडामार्गे गावठी पिस्तुल व रिव्हाल्वरची तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या तस्करीतील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना केल्या होत्या. त्यानुसार कुराडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक दोन दिवसापासून चोपडा तालुक्यात पाठविले होते. या पथकाने वैजापूर व परिसरात खबरे पेरले होते. उमर्टी येथील अजयसिंग हा वैजापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने गावात साध्या गणवेशात सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीच्या जागेवर अजयसिंग पोहचताच पोलिसांनी त्याला घेरले. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ  एक गावठी पिस्तुल, दोन रिव्हाल्वर व तीन जीवंत काडतूस असा ८३ हजाराचा ऐवज मिळून आला. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलअजयसिंग याला वैजापूर येथून जळगावात आणण्यात आले. हे पिस्तुल कोण तयार करते, जळगाव जिल्ह्यात कोणामार्फत ग्राहकांना दिले जाते, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. सायंकाळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपासा स्थानिक गुन्हे शाखेने स्वत:कडेच ठेवला आहे.