राष्ट्रवादीमधील प्रवेशाच्या चर्चेने राज्यभरात मिळाली प्रसिद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:17+5:302021-01-10T04:13:17+5:30

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील प्रवेशानंतर मीदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे, ही केवळ अफवा आहे. ...

The talk of joining the NCP got publicity across the state | राष्ट्रवादीमधील प्रवेशाच्या चर्चेने राज्यभरात मिळाली प्रसिद्धी

राष्ट्रवादीमधील प्रवेशाच्या चर्चेने राज्यभरात मिळाली प्रसिद्धी

Next

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील प्रवेशानंतर मीदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे, ही केवळ अफवा आहे. मी भाजप सोडणार तर नाही, मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील माझ्या प्रवेशाच्या चर्चेने मला राज्यभरात प्रसिद्धी मिळाली, असा दावा आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

अनुुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये केंद्र सरकारने मोठी वाढ केल्याची माहिती देण्यासाठी शनिवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या योजनेची माहिती देऊन भाजपच्या राजीनाम्याविषयीच्या चर्चेसंदर्भातही आमदार सावकारे यांनी माहिती दिली. यावेळी सावकारे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे आदी उपस्थित होते.

राजीनाम्याच्या चर्चेने प्रसिद्धी

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर अनेकजण भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात आमदार संजय सावकारे हे खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे तेदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली. त्याविषयी आमदार सावकारे यांना विचारले असता, त्यांनी या केवळ चर्चा असल्याचे सांगत मी भाजपमधून निवडून आलो असून, भाजपमध्येच राहणार आहे. खडसे यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांशी आपले चांगले संबंध आहेत. मात्र, असे असले तरी आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नसल्याचा दावा आमदार सावकारे यांनी केला. या चर्चेने उलट मला राज्यभरात प्रसिद्धी मिळाली, असेदेखील सावकारे म्हणाले.

वाढदिवसाच्या जाहिरातीबाबत मी सक्ती करू शकत नाही

आमदार सावकारे यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीमध्ये भाजपचे चिन्ह नव्हते. याविषयी सावकारे म्हणाले की, मी वैयक्तिक जाहिराती दिल्या नाहीत. ज्यांनी जाहिराती दिल्या त्यांनी कोणाचे फोेटो, चिन्ह टाकावे, याविषयी मी त्यांनी सक्ती करू शकत नाही, असे सांगत भाजपचे चिन्ह नसलेल्या जाहिरातींशी आपला संबंध नसल्याचे सांगितले.

शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये केंद्र सरकारने ५९ हजार कोटी रुपयांची भरीव वाढ केल्याची माहितीदेखील आमदार सावकारे यांनी यावेळी दिली. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत ‘पीएमएस-एससी’ या योजनेविषयी विरोधकांकडून आरोप करून केवळ राजकारण केले जात असल्याचे आमदार सावकारे म्हणाले. याविषयी राहुल गांधी यांनीही व्टीट करत चुकीचे आरोप केले व नागपूर येथेही विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी आंदोलन करत केंद्र सरकार ही शिष्यवृत्ती बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप खोटे असून, उलट यापूर्वीच या शिष्यवृत्तीत वाढ करणे अपेक्षित होते. मात्र, काॅंग्रेस - राष्ट्रवादीने त्यांच्या काळात ही वाढ केली नसल्याचा आरोप आमदार सावकारे यांनी केला.

Web Title: The talk of joining the NCP got publicity across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.