शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चर्चा महायुती, आघाडीची अन् तयारी स्वबळाची ? कॉग्रेस, अजित पवार गटाने केली समन्वयकाची नियुक्ती

By सुनील पाटील | Updated: January 8, 2024 19:19 IST

लोकसभेसोबतच विधानसभेचीही चाचपणी

जळगाव : जागांचे वाटप होण्याआधीच लोकसभेचे वातावरण तापू लागले आहे. भाजपविरुध्द लढण्यासाठी देशभरातील सर्वच पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे तर भाजपने राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष फोडून एक गट आपल्याकडे वळविला आहे. या गटांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविला जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील कॉग्रेस व महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्येक जिल्ह्यात लोकसभेसाठी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करुन स्वबळाच्या दिशेने तयारी केल्याचे दिसून येत आहे.

कॉग्रेसने देशभरात लोकसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून प्रत्येक नेत्यावर जबाबदारी सोपविली आहे. राज्यात ४८ मतदारसंघाची यादी जाहीर झाली आहे. त्यात जळगावसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, रावेरसाठी आमदार प्रणिती शिंदे, नंदूरबारसाठी आमदार कुणाल पाटील व धुळ्यासाठी माजी मंत्री नसीम खान यांची नियुक्ती झाली आहे. कॉग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार के.सी.वेणुगोपाल यांनी यादी जाहिर केली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने देखील प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडेच समन्वयक प्रमुक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व इतर ११ घटक पक्षांच्या वतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यासह अन्य घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याला त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसभेसोबतच विधानसभेचीही चाचपणीसमन्वयाच्या माध्यमातून पक्षातील काही महत्त्वाचे निर्णय, अंतर्गत बाबी, विकासात्मक कामाच्या चर्चा, पक्षीय भूमिका, तसेच अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. दरम्यान ही नियुक्ती व जिल्हा मिळावे म्हणजे लोकसभेसोबतच,विधानसभा व अन्य निवडणुकांचीही चाचपणी असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टाकलेल्या या जबाबदारीच्या संधीचे सोने करु असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा