शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफिया प्रकरणात तलाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

दुसरीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांची टोळी आणि महसूल कर्मचाऱ्यांदरम्यान कथितरित्या पार पडलेल्या बैठकीत हप्ता ठरवून दिल्यानंतरही ट्रॅक्टर पकडले गेल्याने ...

दुसरीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांची टोळी आणि महसूल कर्मचाऱ्यांदरम्यान कथितरित्या पार पडलेल्या बैठकीत हप्ता ठरवून दिल्यानंतरही ट्रॅक्टर पकडले गेल्याने उद्भवलेल्या वादातून कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

वाळू माफियासोबत तलाठ्याच्या संबंधाची क्लीप व्हायरलबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली. शुक्रवारीच प्रांताधिकारी यांनी मुक्ताईनगर येथे भेट देऊन याबाबत चौकशी केली तर सायंकाळी उशिरा वडोदा तलाठी जयेश जगदीश सुरवाडे यास निलंबित केल्याचा मेल तहसीलदार कार्यालयात धडकला; मात्र शनिवार, रविवार सुटी असल्याने सोमवारी निलंबनाची अधिकृत माहिती समोर आली. सेवा शिस्तीचा भंग केल्याचा ठपका निलंबन आदेशात देण्यात आला आहे.

संबंधांबाबत चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून महसूल कर्मचारी आणि वाळू तस्कर यांच्यातील संबंधाची दबक्या आवाजातील चर्चा व्हायरल क्लीपच्या माध्यमातून उघड झाली असतांना आता अनेक किस्से सामोर येऊ लागले आहे. यात अधिकाऱ्यांच्या मर्जीतील एक तलाठी व त्याचे दोन सहकारी तालुक्यातील वाळू प्रकरण हाताळत होते सुरुवातीला वाळू ट्रॅक्टर पकडून त्यांच्याकडून जागेवरच अर्धे दंडाच्या नावाखाली ६२ हजार रुपये घेऊन ट्रॅक्टर सोडण्याचा प्रकार सुरू झाला. सुमारे ३० ते ३५ वाळू ट्रॅक्टरधारकांनी मार्ग शाेधला. याच्यावर तोडगा काढण्यासाठी वाळू माफिया आणि महसूल कर्मचारी यांच्यात छुपी बैठक पार पडली. यात प्रत्येक ट्रॅक्टरमागे १२ हजार रुपये हप्ता ठरला असल्याचे चर्चा आहे. आता हप्ता ठरल्यानंतरही ट्रॅक्टर पकडले गेल्याने उदभवलेल्या वादातून वाळू तस्कराने ऑडिओ क्लिप व्हायरल करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला.

प्रांत कर्मचारी

दरम्यान, भुसावळ प्रांत कार्यालयात कार्यरत एक जोडपे खासगी वाहनाने अधूनमधून मुक्ताईनगर तालुक्यातील पूरनाड फाटा, अंतुर्ली पिंप्रीनांदू परिसरात फिरतात आणि वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडून रकमा उकळत असल्याचा प्रकार सर्रास करीत आहेत. गेल्याच पंधरवड्यात ही बोंब फुटली होती. त्याची चर्चा थांबत नाही तोच आता वाळू माफियांना महसूल विभागाचे लागेबांधे हळूहळू समोर येत आहे.

चोर सोडून इतरांचा बळी नको

महसूल आणि वाळू तस्करांचे संबंध उघडे पडल्यानंतर आता कारवाईचे सत्र सुरू होण्याचे भाकीत कर्मचारी वर्तवित आहे. वाळू माफियांशी साटेलोटे व व्यवहार करणारे कर्मचारी वरिष्ठांच्या मर्जीतील आहे. यामुळे त्यांना वाचविण्यासाठी इतरांचा बळी जायला नको, अशी चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.