शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जळगाव जिल्ह्यातील तलाठी घन:श्याम लांबोळे, वैशाली पाटील बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:35 IST

प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

ठळक मुद्देकामातील गैरप्रकार, हलगर्जीपणा भोवलादप्तर तपासणीतही आढळल्या त्रुटी

जळगाव : कामात गैरप्रकार, नागरिकांकडून पैशांची मागणी करणे, कर्तव्यात कसूर आदी कारणांमुळे सध्या निलंबित असलेले तलाठी घनश्याम दिगंबर लांबोळे (तत्कालीन तलाठी म्हसावद) व वैशाली पाटील (तत्कालीन तलाठी मेहरूण) यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिले आहेत. महसूल विभागाकडून सातत्याने पाठराखण केली जात असलेल्या या तलाठ्यांवरील या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.लांबोळे यांच्यावर पूर्वी देखील धरणगाव येथे असताना १५ लाखांच्या जमीन महसूल वसुलीच्या रक्कमेचा भरणा न करता त्याचा परस्पर वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र त्यावेळीही त्यांना पाठीशी घालण्यात आले. फौजदारी कारवाई टाळण्यात आली. एवढेच नव्हे तर बक्षीस म्हणून ‘म्हसावद’ सर्कलला नियुक्ती देण्यात आली होती. मात्र लांबोळे यांनी तेथेही गैरकारभार व हलगर्जीपणा सुरूच ठेवल्याने त्यांना निलंबित करून जामनेर तहसील कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले होते. तसेच बडतर्फीची नोटीसही बजावण्यात आली होती. लांबोळे यांच्यावरील गंभीर स्वरूपाच्या ४ आरोपांवरून त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश प्रांताधिकाºयांनी सोमवार, १७ सप्टेंबर रोजी काढले आहेत.तर वैशाली पाटील ह्या मेहरूण तेथे तलाठी म्हणून कार्यरत असताना नागरिकांची कामे अडवून ठेवणे, पैशांची मागणी करणे, कर्तव्यात कसूर आदी तक्रारी होत्या. त्यांची तळेगाव ता.जामनेर येथे बदली करण्यात आली होती. त्या पदावरून त्यांना निलंबित करून जामनेर तहसील कार्यालय मुख्यालय म्हणून देण्यात आले होते. त्यांनाही मेहरूण येथील कार्यकाळातील गैरकारभाराबाबत बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्यावर २६ गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश प्रांताधिकाºयांनी १७ सप्टेंबर रोजी काढले आहेत.त्यानंतर लांबोळे यांनी २४ ते २८ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत महसूल अर्हता परिक्षेस जाण्याचे खोटे कारण दिले. मात्र पुरावा सादर केला नाही. मात्र महसूल परिक्षेच्या निकालपत्रात मात्र ते परिक्षेला गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यावरून त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. तसेच ७/१२ संगणकीकरण कामकाजाबाबत तहसील कार्यालयात आयोजित बैठकीस देखील लांबोळे अनुपस्थित राहिले. याबाबत लांबोळे यांना चार नोटीस देण्यात आल्या. तरीही त्यांनी खुलासा सादर केला नाही. तसेच मंडळ अधिकारी म्हसावद यांनी दिलेल्या अहवालानुसार लांबोळे यांच्याकडील शासकीय वसुली, कृषी गणना, संगणकीकृत ७/१२ आदी अनेक कामे प्रलंबित असून ते कोणतीही पूर्व सूचना न देता, परवानगी न घेता सातत्याने गैरहजर राहतात. बोंडअळीचे पंचनामे देखील होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून जिल्हाधिकाºयांनी म्हसावद येथे जाऊन दप्तर तपासणी केली असता त्यात कीर्द पुस्तक, चलन फाईल, कॅशबुक, वारसनोंद वही, गाव नमुना नं.६ (ड पत्रक), गाव नमुना नं.८-ब आदी कागदपत्र आढळून आले नाहीत. त्याबाबत नोटीस बजावण्यात आली. मात्र ते गैरहजर असल्याने घरी जाऊन दर्शनी भागावर डकवावी लागली. ती कागदपत्र अद्यापही त्यांनी सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी कामात हलगर्जीपणा, गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.दप्तर तपासणीतही आढळल्या त्रुटीलांबोळे यांच्या बडतर्फी आदेशात ४ मुद्यांआधारे त्यांच्यावर गैरवर्तणुक, शिस्तभंग, कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. लांबोळे यांच्याविरूद्ध वडनगरी येथील नरेंद्र दाजी पाटील व इतर ग्रामस्थांनी मे ते आॅक्टोबर २०१४ दरम्यानची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत मिळाली नसल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यावर तहसिलदारांनी नोटीस देऊन खुलासा मागवूनही त्यांनी खुलासा सादर न केल्याने त्यांच्यावर जुलै २०१७ ची एक वेतनवाढ एक वर्षाकरीता राखून ठेवण्याची शिक्षा देण्यात आली होती.वैशाली पाटील यांच्यावर २६ दोषारोपतत्कालीन मेहरूण तलाठी वैशाली मोतीराम पाटील यांच्यावरील आरोपांबाबत तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यात २६ दोषारोप ठेवण्यात आले आहेत. शिक्षण कर, वाढीव शिक्षण कर, रोजगार हमी योजनेची वसुली सरकारी खजिन्यात योग्य त्या खाती जमा केलेल्या नाहीत. त्याबाबतचा ताळमेळ घेतल्याचे दिसून येत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात तलाठी दप्तर गाव नमुना नं.१ ते २१ नमुन्यामध्ये सुस्थितीत ठेवले नसून ते अद्ययावत केलेले नाही. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकाºयांनी केलेल्या दप्तर तपासणीत नागरिकांचे सुमारे ७०० फेरफार नोंदीचे अर्ज विनाकारण प्रलंबित असल्याचे आढळून आले. तसेच दैनंदिन कामकाजातील अनेक बाबींमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली. विलंब शुल्काची आकारणीच न करणे, विलंब शुल्क नोंदवही अद्ययावत न करणे, नोंदी प्रमाणित होऊनही ७/१२वर न घेणे, आदी अनियमितता व गैरप्रकार आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागJalgaonजळगाव