शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

५०० रुपयांची लाच घेताना तलाठ्यास अटक

By admin | Updated: May 21, 2014 01:14 IST

बोअरवेलची नोंद : टाकरखेडा येथील घटना

दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे बोअरवेलची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना तेथील तलाठ्यास लाचलुचपत विभागाचे रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांनी आपल्या गट क्रमांक १७१/२ अ या एक हेक्टर शेतात बोअरवेल केली आहे. त्याबाबत सातबारा उतारा घेण्यासाठी टाकरखेडा येथील तलाठी सुभाष कौतीक गवळी यांच्याकडे आले. वेळोवेळी मागणी करूनही तलाठी या कामाबद्दल ५०० रुपयांची मागणी करीत राहिले. अखेर तलाठी गवळी यांना ५०० रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार २० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता टाकरखेडा येथील तलाठी कार्यालयात पैसे देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार केली. त्यानुसार टाकरखेडा येथील तलाठी कार्यालयात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तक्रारदार पैसे घेऊन पोहचले. त्यांनी तलाठी गवळी यांच्याकडे या कामाबद्दल ५०० रुपये दिले. त्याचवेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना पकडले. विभागाच्या सापळ्यात तलाठी गवळी रंगेहाथ सापडले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाचे अधिकारी शशिकांत माहूरकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.