शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:23 IST

रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देमयत बालकाचे वडील व आदिवासी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीआदिवासी तरूणीच्या बाळाचा प्रसूतीच्या वेळी झाला होता मृत्यू

बिडगाव, ता.चोपडा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या कुंड्यापाणी या आदिवासी गावात प्रसुतीसाठी रूग्णालयात न्यायला १०२ क्रमांकावर वारंवार फोन करूनही रूग्णवाहिका न आल्याने गरोदर महिला वेळेवर रूग्णालयात न पोहचल्यामुळे तिचे बाळ दगावल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली होती. यामुळे येथील संतप्त मयत मुलाचे वडील व आदिवासी संघटनेने जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदन देत रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करणाºयांंची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.कुंड्यापाणी हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गाव आहे. येथील नफिसा शकील तडवी (वय २३) ही तरूण महिला पहिल्या प्रसूतीपूर्व वेदनांनी क१६ रोजी सकाळी विव्हळत होती. सातपुड््यच्या पायथ्याथी असलेल्या या छोट्याशा गावात आरोग्याविषयी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी धानोरा गाठावे लागते व हे गाव येथून आठ कि.मी.आहे. त्यातही रस्ता खूप खराब असल्याने रूग्णवाहीका उपलब्ध व्हावी म्हणून नातेवाईकांनी १०२ या क्रमांकावर वारंवार संपर्क साधला. मात्र तब्बल दोन तास उडवाउडवीची उत्तरे मिळाली व रूग्णवाहिका आलीच नाही. शेवटी वेदना वाढतच गेल्याने नातेवाईकांनी रिक्षाने या गरोदर महिलेस सकाळी १०:३० वाजता धानोरा प्राथमिक आरोग्य केद्रात नेले होते. मात्र आधीच जास्त वेळ झाली व वेळेवर गाडी न मिळाल्याने खराब रस्त्याने रिशात आठ कि.मी रूग्णास नेल्याने तिची तब्येत अधिक खालावली. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले यांनी तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवले होते. तेथे डॉक्टरांनी तिची प्रसूती केली. मात्र वेळेवर रूग्णालयात न पोहचल्याने बाळ दगावल्याची दुर्दैर्वी घटना सोमवारी घडली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. त्यामुळे घटना समोर आल्याने मंगळवारी मयत बाळाचे वडील शकील नामदार तडवी व आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच या संघटनेचे जिल्हाध्यक्ष जहांगीर महंमद तडवी यांनी उपजिल्हाधिकारी कदम यांना देऊन आदिवासी महिलेस रूग्णवाहिकेसाठी ताळकटत ठेऊन मुलाला गमवल्याची गंभीर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी खर्डी येथील प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित होते. निवेदनावर कुंड्यापाणी ग्रामस्थ व संघटनेच्या पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यChopdaचोपडा