शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढताच केळीवर ‘करपा’ची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:06 IST

दोन दिवसांपासून चिनावल व परिसरातील केळी पट्ट्यात थंडीची बऱ्यापैकी चाहुल लागल्याने केळी बागांवर करपा सदृश्य रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देथंडीतील करपा व चरकामुळे केळी बागांचे मोठे नुकसान होतउत्पादकांनी काळजी घ्यावी

चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून चिनावल व परिसरातील केळी पट्ट्यात थंडीची बऱ्यापैकी चाहुल लागल्याने केळी बागांवर करपा सदृश्य रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत. थंडीतील करपा व चरकामुळे केळी बागांचे मोठे नुकसान होते. पर्यायाने केळी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यासाठी उत्पादकांनी प्राथमिक अवस्थेतच काळजी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.गेल्या दोन दिवसापासून थंडी बºयापैकी पडत आहे. चिनावलसह कुंभारखेडा, वाघोदा, विवरा, वडगाव, लोहारा, सावखेडा परिसरात नवती केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सद्य:स्थितीत हा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे. केळी बागांमधील केळीच्या पानांवर लाल तांबूस आकाराचे छोटे छोटे ठिपके दिसू लागले आहे. केळी पानांच्या कडा करपू लागले आहे. येणाºया काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढल्यास करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यासाठी केळी उत्पादकांनी आतापासूनच करपाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहत.उत्पादकांनी आपले केळीबाग आणि शेताचे बांध शक्यतो तणमुक्त ठेवावे. पाणी साचून राहणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होईल याकडे लक्ष द्यावे. केली बागेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असावे यासारख्या प्राथमिक बाबींवर उत्पादकाने लक्ष दिल्यास करपा रोगावर नियंत्रण होऊ शकते. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच कृषी विभागाने उत्पादकांना आवश्यक ते औषधे फवारणीचे मार्गदर्शन करावे व कृषी विभागामार्फत शेतकºयांना औषधी पुरवाव्यात, अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे.करपा रोगाने केळी ३० टक्क्यांपेक्षा जास्त करपली असल्यास हे पान काढून नष्ट करावे. रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्लोरथलोनील २ ग्रॅम कार्बेन्डाझिम, मेक जॉब किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ग्रॅम पाण्यात फवारणी करावी. अन्नद्रव्यांची मात्रा वेळेनुसार द्यावी. फवारणी शक्यतो सकाळी करावी. यासारख्या सुरक्षा घेतल्यास करपा रोगावर नियंत्रण होऊ शकते, असे अनुभवी व परिसरातील कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यRaverरावेर