शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

निगेटीव्ह अहवालानंतर कोविडची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:06 IST

१६ निगेटीव्ह रुग्ण कोविड रुग्णालयात आॅक्सिजनवर : अहवालांच्या शाश्वतीवर प्रश्नचिन्ह

जळगाव : कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह येऊनही अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्यात खासगी तसेच शासकीयस्तरावरही आता कोरोना चाचण्यांच्या शाश्वतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे़ काही प्रकरणात तीस ते चाळीस टक्के या चाचण्या बदलूही शकतात, असे डॉक्टर्सकडून सांगण्यात येत आहे़ याशिवाय निगेटीव्ह रिपोर्ट आलेले १६ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना आॅक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी एका महिलेला अहवाल निगेटीव्ह आल्याने तसेच त्या ठिकाणी व्हँटीलेटरर्स उपलब्ध नसल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते़ मात्र, आॅक्सिजनची पातळी खालावली असल्याने खासगी रुग्णालयांनी व्हँटीलेटर्स खाली नसल्याच्या सबबी देत या महिलेला दाखल करून घेतले नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्यावर या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला़ यामुळे अहवाल व आॅक्सिजनची क्षमता हे दोन मुद्दे प्रकर्षाने समोर आले आहेत़ काही प्रकरणांमध्ये पहिला अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर दुसरा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची काही प्रकरणे समोर आल्यामुळे आता या मुद्द्यांवर चर्चा सुरू झालेल्या आहेत़आॅक्सिजनची पातळी कमी असलेल्या रुग्णांमध्ये अहवालाची शाश्वती ही ६० ते ७० टक्केच असू शकते़ अनेक वेळा निगेटीव्ह अहवाल असतानाही लक्षणे सर्व कोविडसारखी असल्याने अशा रुग्णांना डिस्चार्ज देता येत नाही, शिवाय बाहेरही कोणी घेत नाही़ त्यामुळे सद्यस्थितीत अशा १६ रुग्णांना कोविड रुग्णालयातच दाखल करण्यात आले असून अहवाल निगेटीव्ह असतानाही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़अशी माहिती रुग्णालयातून मिळाली़ कोविड ही पूर्णत : नवीन चाचणी असून त्यात काही प्रकरणात अहवाल बदलू शकतात, असाही दावा डॉक्टरांकडून केला जात आहे़खासगी डॉक्टर्सची भूमिकाज्या रुग्णांना न्यूमोनिया आहे किंवा आॅक्सिजनची क्षमता, पातळी कमी आहे, अशा रुग्णांना शासकीय यंत्रणेने डिस्चार्जच देऊ नये त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, हे रुग्ण कोविड बाधित असण्याची शक्यता अधिक असते, अशा स्थितीत त्यांना दाखल करून घेणे म्हणजे अन्य नॉन कोविड रुग्णांच्या जिवाचा धोका पत्करणे असल्याने असे रुग्ण न घेण्याची खासगी डॉक्टर्सची भूमिका आहे़अनेक रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आहेत़ मात्र, आॅक्सिजनची क्षमता खूपच कमी असल्याने अशांना आपण कोविड रुग्णालयातच दाखल केले आहे़ कमी लक्षणे असलेल्यांना सध्या डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात हलविले आहे़- डॉ़ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव