शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

जळगाव जिल्ह्यात ४२ मद्य विक्री दुकानांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 13:00 IST

जिल्ह्यात २२१ दुकानांना मद्य विक्रीची परवानगी

जळगाव : लॉकडाउन काळात नियमांचे उल्लंघन करुन अवैधरित्या मद्य विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ४२ मद्य विक्री दुकानांवर विभागीय गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर अंतिम कारवाई करण्याचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तयार केले जात आहेत. परवाना निलंबन, रद्द किंवा दंडात्मक यापैकी एक कारवाई होऊ शकते. लॉकडाऊनमध्ये उल्लंघन केल्याचा सर्वांनाच गुन्हा केला आह.दरम्यान, लॉकडाऊन काळात अवैध मद्य विक्री केल्याप्रकरणी नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स, चाळीसगाव येथील क्रिश वाईन, जळगाव येथील अजिंठा चौकातील आर.के. वाईन्स व आमदार सुरेश भाळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावे असलेल्या पोलन पेठेतील नीलम वाईन्स यांचा मद्य विक्रीचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. उर्वरित दुकानांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.क्रिश ट्रेडर्सचे कनेक्शन अमळनेर व नंदुरबार येथे जोडण्यात आल्याच्या संशयावरुन तेथीलही मद्य विक्री दुकानांची तपासणी झाली. त्यात अमळनेर येथील १५ मद्य विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नंदुरबारच्या सोनी ट्रेडर्सचा परवानाही कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.जळगाव-अमळनेर कनेक्शनअमळनेर येथे २३ एप्रिल रोजी मद्य विक्री दुकान व बारची तपासणी करण्यात आली. त्यात १५ मद्य दुकानांमध्ये मद्यात तफावत तर रेकॉर्डही अद्ययावत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विभागीय गुन्हे नोंदविण्यात आले होते. या दुकानांमध्ये नरेश लिकर्सच देशी दारु दुकान, एस.के. ललवाणी यांचे देशी दारु दुकान, सुनीता भरत ललवाणी यांचे देशी दुकान, एच.टिल्लुमल कंपनीचे वाईन शॉप, भरुचा ब्रॅँडी हाऊसचे वाईन शॉप, हॉटेल न्यू योगेशचे परमीट रुम, हॉटेल प्रतिभाचे परमीट रुम, हॉटेल राजा गार्डनचे परमीट रुम, हॉटेल साई प्रसादचे परमीट रुम, हॉटेल उदयचे परमीट रुम, हॉटेल आरामचे परमीट रुम, हॉटेल कुणालचे परमीट रुम, हॉटेल सम्राटचे परमीट रुम, हॉटेल पायल व हॉटेल पूनमच्या परमीट रुमचा समावेश आहे.शहरात सात ठिकाणी तफावतराज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, मुलगा विशाल सुरेश भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय नोतवाणी यांचे नशिराबादचे विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स व नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली होती. यात सर्व दुकानांवर विसंगतीचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. एन.एन.वाईन्स व नीलम वाईन्स येथे मुदतबाह्य बियरचा साठाही आढळून आला होता. त्यानंतर शनी पेठ पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका कारमधून अवैध मद्यसाठा पकडला होता.चौकशीअंती ही दारु हॉटेल पांचाली मधून आणल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या हॉटेलची तपासणी केली असता तेथेही मद्यसाठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे या परवानाधारकावरही विभागीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनंतर दुकान सुरु करण्यास परवानगीलॉकडाउनमध्ये काही अंशी शिथीलता मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटी-शर्तीवर जिल्ह्यात २२१ मद्य विक्री दुकानांना परवानगी दिली आहे. त्यात बियर शॉप १०१, देशी दारु दुकान ९९ तर २१ वाईन शॉपचा समावेश आहे. दरम्यान, दुकाने सुरु करण्याची परवानगी देताना त्यात पक्षपातीपणा केल्याची तक्रार पोलन पेठेतील वाईन किंगचे मालक सुनील भंगाळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहिवडे यांच्याकडे केली होती. शहरातील १२ दुकानांना परवानगी देताना वाईन किंगलाच वेगळा नियम का लावण्यात आला असा जाब त्यांनी विचारला होता. या तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी दुकान सुरु करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, आता आपले दुकान सुरु करण्यास परवानगी मिळाल्याचे सुनील भंगाळे यांनी सांगितले.जिल्ह्यातील ४२ मद्य विक्री दुकानांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्या-त्या निरीक्षकांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जात आहेत. जळगाव व बीड या दोन जिल्ह्यांचा पदभार आहे. त्यामुळे बीडमधूनच प्रस्ताव आॅनलाईन जिल्हाधिकाºयांकडे पाठविला जात आहे. सर्वच दुकानांवर टप्प्याटप्प्याने कारवाई होईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.-नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

टॅग्स :Jalgaonजळगाव