जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव पाच डिसेंबर पासून सुरू होणारआहे.हा जलतरण तलाव सुरू व्हावा,यासाठी खेळाडू काही दिवसांपासून मागणी करत होते. त्यानुसार हा जलतरण तलाव आता सुरू होणार आहे. जिल्ह्यात असलेल्या ५० ते ६० खेळाडूंना सरावासाठी हा जलतरण तलाव उपयुक्त ठरेल.
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST