जळगाव : बोदवड तालुक्यात चंदा उर्फ कैलास या तृतीयपंथीचा खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर सोमवारी शिरसोली येथील रेल्वे स्टेशन हद्दीत एका तृतीयपंथीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. या तृतीयपंथीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे रेल्वेतून पडून मृत्यू झाला की घातपाय हे स्पष्ट झालेले नाही.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील खाब क्र.४०७/२२ अप लाईनजवळ एका तृतीयपंथीचा सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर साडी परिधान केलेल्या अनोळखी तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला. रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी रविवारी बोदवड तालुक्यात नशिराबाद येथील मुळ रहिवाशी असलेल्या चंदा उर्फ कैलास या तृतीयपंथीचा खून झाल्याची घटना घडल्याने या घटनेबाबत उलटसुलट चर्चा आहे.याबाबत शिरसोली रेल्वे स्टेशन मास्टर योगेश खांबे यांनी एमआयडीसी पोलीसांत खबर दिल्यावरुन हवालदार जितेंद्र राठोड, प्रकाश पवार यांनी मृतदेह रुग्णालयात आणला. तृतीयपंथीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शिरसोली येथील रेल्वे स्टेशन हद्दीत तृतीयपंथीचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:08 IST