शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

 विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 12:35 IST

सासरच्यांचा आरोप

ठळक मुद्दे गीझरचा स्फोट झाल्याचा दावा, मात्र घटनास्थळावर आढळला रॉकेलचा डबा व पेटी

जळगाव : घरात आंघोळीसाठी गेलेल्या रिया विक्की सचदेव (२८) या विवाहितेचा जळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता सम्राट कॉलनीत घडली. रिया यांनी आत्महत्या केली की हिटरचा शॉक लागून जळाल्याने मृत्यू झाला हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिया यांचे पती विक्की सचदेव हे किराणा वस्तूंचे मार्केटींग करतात. शनिवारी सकाळी ते कामावर गेले होते तर सासु व इतर सदस्य खालच्या खोलीत होते. रिया या ११ वाजता वरच्या मजल्यावर आंघोळीसाठी गेल्या होत्या. अर्ध्या तासाने घरातून धूर येत असल्याचे पाहून शेजारील लोकांनी धाव घेतली असता रिया या जळत होत्या. लोकांनी अंगावर चादर टाकून त्यांना विझविले व तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रिया यांना मृत घोषित करताच रुग्णालयात आलेल्या सासु, पती व इतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.मृत्यूबाबत तर्कवितर्करिया यांचा मृत्यू हिटरचा शॉक लागून झाल्याचे नातेवाईकांकडून सांगितले जात होते. घरात गादी व इतर कपडेही जळालेले होते. शिवाय घरात कोणीच नसल्याने खरोखर हिटरचा शॉक लागला कि त्यांनी जाळून घेतले हे समजू शकले नाही. गल्लीतील चर्चेनुसार रिया यांनी दोन दिवसापूर्वीच पेट्रोल आणले होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी अशीही चर्चा होती. रिया यांना दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले शाळेत गेली होती तर सासु व इतर नातेवाईक खालच्या होते.घटनास्थळावर आढळला रॉकेलचा डबाघटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पाटील, ससाणे, शिवदास चौधरी, दिनकर खैरनार, सचिन चौधरी व संतोष पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घरात रॉकेलचा डबा, आगपेटी, चप्पल व चष्मा अशा वस्तू आढळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांनी घराला कुलुप लावून चावी स्वत: जवळ ठेवली होती.त्यानंतर सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची पाहणी केली व नंतर घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, रिया यांच्या डाव्या कानातून रक्त आलेले होते तर काही दागिने काढून ठेवण्यात आले होते, त्यामुळे संशय अधिक बळावला आहे.आत्महत्या नव्हे, खून केल्याचा आरोपघटनेची माहिती मिळाल्यानंतर रिया याचे मेहुणे कैलास सचदेव व बहिणीचे सासरे होलाराम जीवनराम सचदेव (रा.भुसावळ) यांनी रिया हिचा मृत्यू हिटरच्या शॉकने किंवा आत्महत्या नाही, तो खूनच असल्याचा आरोप केला असल्याचा माहिती पोलिसांनी दिली. सासुकडून प्रचंड छळ होत होता, असे मेहुण्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या तपासातही छळ होत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सासरच्या लोकांनी गीझरचा स्फोट व हिटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगितले, परंतु गिझर व हिटर जैसे थे होते, त्यामुळे सासरच्या लोकांच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे आढळून आले.रिया हिला आई व वडील नाहीत. बहिणीच्या सासरच्यांनीच तिचा विवाह लावून दिला होता.पेटवून घेईल व पेटवून टाकूची धमकीमाहेरच्या लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रिया हिला प्रचंड त्रास होता, त्यामुळे सासुच्या छळाला कंटाळून एखाद दिवशी मी स्वत:च रॉकेट टाकून आत्महत्या करुन घेईन असे तिने अनेकवेळा बोलून दाखविले होते तर सासरच्यांनीही तुला जाळून टाकू अशी धमकी दिली होती. या घटनेत रिया हिचा जळाल्याने मृत्यू झालेला आहे, त्यामुळे तीने स्वत:हून जाळून घेतले की जाळले हा प्रश्न असून पोलीस तपास व शवविच्छेदन अहवालातच काही बाबींचा उलगडा होईल, अशी माहिती उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. घटनास्थळावरील काही संशयास्पद वस्तू, सासरच्यांकडून मिळालेली माहिती व माहेरच्या लोकांचा आरोप यामुळे डॉ.नीलाभ रोहन यांनी घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी केली.