शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रावेरजवळील क्रूर हत्या प्रकरणी मुलीवर अत्याचाराचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:06 IST

रखवालदारांच्या घरात गाढ झोपेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांची कुºहाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देरखवालदार पालक बाहेरगावी गेलेले असताना घडली घटनासात संशयित ताब्यात तिघांवर संशयतिघा संशयितांची कसून चौकशी

किरण चौधरीरावेर (जि.जळगाव) : शहरानजिक असलेल्या केळी बागेत रखवालदारांच्या घरात गाढ झोपेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांची कुºहाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सविता (वय १४) , राहुल (वय ११), अनिल (वय ८ वर्षे) व सुमन उर्फ नाणी (वय ५ वर्षे)अशी या मुलांची नावे आहेत. एका मुलीचा मृतदेह अर्धनग्ग अवस्थेत आढळून आल्याने अत्याचाराचा संशय आहे. दरम्यान, सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.बोरखेडा रस्त्यावरील केळीबागेत रखवालदार महेताब गुलाबसिंग भिलाला याचे घर आहे. महेताब हा पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी गढी (ता.भगवानपुरा, जि.खरगोन) येथील चुलत भावाच्या नातवाच्या दशक्रिया विधीसाठी मोटारसायकलीने गेला होता. चार मुले घरीच थांबली होती.शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या शेतमालक शेख मुस्तफा शेख यासीन (रा.मण्यारवाडा, रावेर) शेतात आले असता त्यांनी रखवालदाराच्या घरात डोकावून पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिले. घरात खाटेवर एकट्या झोपलेल्या १४ वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हे क्रूर कृत्य झाले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.भारतीय पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस निरीक्षक समाविष्ट असलेल्या विशेष पोलीस पथकाकडे तपास सोपविण्यात आला आहे. पोलीस पथक व जंजीर श्वानपथक तपासाला सुरुवात केली. जंजीर ने रावेर रोडवरील भंगारवाल्यांच्या निवासस्थानापर्यंत माग दाखवला आहे.हत्याकांडातील चौघा मृतदेहांचे लैंगिक अत्याचाराच्या संशयामुळे न्यायवैद्यकशास्त्र तथा वैद्यकीय दृष्ट्या पारदर्शकपणे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, महेताबचा मोठा मुलगा संजय याच्या सांगण्यावरून त्याचे काही मित्र रात्री घटनास्थळी जाऊन आल्याची माहिती मिळाल्याने सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तिघांवर संशय असून, पोलीस उशिरापर्यंत त्यांची चौकशी करीत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर