शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील लिलाव झालेल्या गटांमधूनही वाळू उपशास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:02 IST

वाळू गटांचा ताबा पुन्हा तहसीलदारांकडे

जळगाव : नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी मे महिन्यापासून करण्यात येणार होती. ती सुरू न झाल्याने लिलाव झालेल्या वाळू गटांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत आता ६ जून रोजी सुनावणी होणार असून त्यात स्थगिती उठविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लिलाव झालेल्या १२ वाळू गटांचा उपसाही थांबविण्यात आला असून हे वाळूगट पुन्हा तहसिलदारांकडे सोपविण्याचे आदेश अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायासोबतच शासकीय विकासकामांनाही याचा फटका बसणार आहे.नागपूर खंडपिठात दाखल याचिकेत २९ एप्रिल २०१९ रोजीच्या आदेशान्वये वाळू लिलावावरील स्थगिती उठविण्यात आली होती. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली. त्यात ५ वाळू गट शासकीय कामासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्या-त्या विभागांकडून त्या वाळू गटांमधून वाळू उपसाही सुरू करण्यात आला आहे. तर ई-निविदा प्रक्रियेद्वारे १२ वाळू गटांचा ठेका गेला आहे. त्या वाळू गटांमधूनही उपसा सुरू झाला आहे. मात्र न्यायालयाने वाळू गटांच्या लिलावाला पुन्हा स्थगिती दिल्याने महसूल व वनविभागाचे अवर सचिव यांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून सर्व वाळू गटांना स्थगिती देण्यात आली असल्याचे कळविले आहे.वाळू ठेके दिलेल्या तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, जळगाव मध्यम प्रकल्प, निम्न तापी प्रकल्प व संबंधीत कंत्राटदारांना वाळू उपशास स्थगिती झाल्याचे कळविण्यात आले आहे. तसेच वाळू गटाचा ताबा संबंधीत तहसीलदारांना सोपविण्याचे आदेशही देण्यात आले आहे.यंदा राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडून जिल्ह्यातील ३५ वाळू गटांना मंजुरी मिळाली होती. त्यातील ५ वाळूगट शासकीय विभागांना त्यांच्या कामांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तर ई-लिलावात १२ वाळू गटांनाच प्रतिसाद मिळाल्याने तेवढ्याच वाळू गटांचा लिलाव झाला होता. या १७ वाळू गटांमधून उपसाही सुरू झाला होता. मात्र उर्वरित वाळू गटांच्या लिलावासाठी फेरनिविदेची प्रक्रियाही बाकी होती. मात्र सर्वच प्रक्रियेला खीळ बसली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव