चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या बदलीस मॅटने स्थगिती दिली आहे. शुक्रवारी ही सुनावणी झाली.बच्छाव यांचा चाळीसगाव परिमंडळातील कार्यकाळ पूर्ण होण्यास अवधी असतानाच त्यांची धुळे येथे पोलीस प्रशिक्षण विभागात प्राचार्यपदी बदली करण्यात आली होती. त्यांनी याविरोधात मॅटकडे धाव घेऊन बदली स्थगितीसाठी अपील होते. त्यांची बदली पुन्हा धुळे येथे करण्यात आल्याचा मुद्दाही यावेळी युक्तीवादात मांडण्यात आला.चाळीसगाव येथे येण्यापूर्वी ते धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होते. न्यायमूर्ती मदन त्र्यंबक जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. बच्छाव यांच्या बाजूने अॅड. धनंजय ठोके यांनी युक्तीवाद केला.दरम्यान, प्रशांत बच्छाव यांची बदली राजकीय दबावापोटी झाल्याचीही चर्चा येथे होत होती.
चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या बदलीस मॅटची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:35 IST
चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या बदलीस मॅटने स्थगिती दिली आहे.
चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या बदलीस मॅटची स्थगिती
ठळक मुद्देकार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच बदली करण्यात आली होतीबदलीविरोधात घेतली होती मॅटकडे धावराजकीय दबावापोटी बदली झाल्याची चर्चा