शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : कामावर रुजू न होणारा एक कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:40 IST

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता विभागात नियुक्ती करुनही कामावर रुजू न होणाऱ्या मनपाच्या हॉस्पिटल विभागातील शिपाई चंद्रशेखर बेलोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. तसेच निवडणुकीच्या कामांमध्ये दुर्लक्ष केल्यास कोणत्याही कर्मचाºयाला पाठीशी घातले जाणार नाही अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.मतमोजणी केंद्राची पाहणी१ आॅगस्ट रोजी होणाºया ...

ठळक मुद्देमतमोजणी केंद्राची पाहणी७० मतदार यंत्रे आढळली नादुरुस्त

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता विभागात नियुक्ती करुनही कामावर रुजू न होणाऱ्या मनपाच्या हॉस्पिटल विभागातील शिपाई चंद्रशेखर बेलोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. तसेच निवडणुकीच्या कामांमध्ये दुर्लक्ष केल्यास कोणत्याही कर्मचाºयाला पाठीशी घातले जाणार नाही अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.मतमोजणी केंद्राची पाहणी१ आॅगस्ट रोजी होणाºया मनपा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या नियोजनाची बुधवारी मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे यांनी आढावा घेतला. सकाळी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्यानंतर दुपारी एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टर ८ मधील मतमोजणी ठिकाणाला भेट दिली.दरम्यान निवडणूक काळात मतदारांना आमीष देणे किंवा धमकाविण्याचे प्रकार वाढतात. सर्व निवडणुका या भयमुक्त व कोणत्याही गैरप्रकारात पार पडू नये यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सूचना पोलीसांना देण्यात आल्या. तसेच शहरातील हॉटेल्स रात्री उशीरापर्यंत उघड्या राहिल्यास तत्काळ कारवाई करण्याचा सूचना देखील लवंगारे यांनी दिल्या.मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे यांनी शहरातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खोसे व लक्ष्मीकांत कहार हे उपस्थित होते.७० मतदार यंत्रे आढळली नादुरुस्तबुधवारी मतमोजणी ठिकाणावर मतदार यंत्राची चाचणी घेण्यात आली. यामध्ये ७० मतदान यंत्रामध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून हे ७० मतदान यंत्रे बदलण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी एकुण ५१७ मतदान यंत्राची आवश्यकता असून, मनपाने ऐनवेळी काही अडचण येवू नये म्हणून ५९६ मतदान यंत्रे तयार ठेवली आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव