पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : पहूर येथील कसबे भागातील रहिवासी तथा रिक्षाचालक विजय रामदास थोरात (४७) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्यावर खासगी वित्तसंस्थेचे कर्ज होते. या विवंचनेतून त्याचे आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे.प्राप्त माहितीनुसार, मयत विजय रामदास थोरात हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. स्वत:च्या घराजवळील गुरांच्या गोठ्यात सोमवारी सकाळी साडेसहापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्याच्यावर खासगी वित्तसंस्थेचे कर्ज थकले होते, दोन दिवसांपूर्वी त्याची रिक्षा या वित्तसंस्थेने ओढून नेली होती. या विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे.पहूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तो माजी सरंपच विनोद थोरात यांचा भाऊ होता. गणेश थोरात यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर येथे कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:35 IST
पहूर येथील कसबे भागातील रहिवासी तथा रिक्षाचालक विजय रामदास थोरात (४७) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्यावर खासगी वित्तसंस्थेचे कर्ज होते. या विवंचनेतून त्याचे आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर येथे कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या
ठळक मुद्देखासगी वित्तसंस्थेचे थकले होते कर्जवित्तसंस्थेने रिक्षा नेली होती ओढूनघराजवळील गोठ्यात संपविले स्वत:ला