शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडीतील संशयित आरोपीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:24 IST

कापूस चोरीच्या गुन्ह्यात धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या संतोष बंडू भील (वय ४८ रा.वराड, ता.धरणगाव) या संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली. वराड गावातील चार जणांनी संतोष याला बेदम मारहाण केली होती, त्यानंतर पोलिसांनीही अटक केल्यानंतर मारहाण केली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन या सर्वांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली. दरम्यान, संतोष याच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. हा गुन्हा सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे जिल्हा रुग्णालयात तणाव  ग्रामस्थ व पोलिसांनी मारहाण केल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे

 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि ६ : कापूस चोरीच्या गुन्ह्यात धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या संतोष बंडू भील (वय ४८ रा.वराड, ता.धरणगाव) या संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली. वराड गावातील चार जणांनी संतोष याला बेदम मारहाण केली होती, त्यानंतर पोलिसांनीही अटक केल्यानंतर मारहाण केली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन या सर्वांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली. दरम्यान, संतोष याच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. हा गुन्हा सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका शेतातून संतोष भील याने कापूस चोरल्याच्या संशयावरुन २७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता वराड गावाजवळ महामार्गावर गावातील चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुध्द पडला. हा प्रकार समजल्यानंतर संतोषचा पुतण्या अनिल सोनवणे व संजय बागुल हे घटनास्थळी गेले असता तेथे २० ते २५ जण होते तर संतोष बेशुध्द पडलेला होता. सोनवणे व बागुल यांनी त्याला धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तीन दिवस उपचार केल्यानंतर संतोष याची सुटका झाली होती.२८ रोजी गुन्हा दाखल ३ रोजी अटककापूस चोरीप्रकरणी संतोष याच्याविरुध्द २८ आॅक्टोबर रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी संतोष याला धरणगाव पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्याने चोरलेला १०० किलो कापूस काढून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस कोठडीत असताना खालावली तब्येत४ नोव्हेंबर रोजी तब्येत खालावल्याने संतोष याला पोलिसांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक खालावल्याने त्याला ५ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजता जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.५० वाजता मृत्यू झाला.