शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सुधीर डहाकेंना निलंबित करा

By admin | Updated: December 4, 2015 01:13 IST

जळगाव : पाणी योजनांमधील अपहार प्रकरणी विभागीय आयुक्तालयातील चौकशी समितीच्या अहवालानुसार काम झाले नाही.

जळगाव : पाणी योजनांमधील अपहार प्रकरणी विभागीय आयुक्तालयातील चौकशी समितीच्या अहवालानुसार काम झाले नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले उपअभियंता सुधीर डहाके यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. पण तरीदेखील त्यांना अटक होत नाही. जि.प.ने या प्रकरणात प्रथम तत्कालीन कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघ व उपअभियंता डहाके यांना निलंबित का केले नाही तसेच इतर 28 पाणी योजनांप्रकरणी अजूनही का गुन्हे दाखल झाले नाहीत, असे प्रश्न गुरुवारी जि.प.स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यावर या प्रकरणात जि.प.चौकशी समिती नेमणार आहे. या समितीचे अहवाल आल्यानंतर तथ्य तपासून गुन्हे दाखल करण्यासह अभियंत्यांवरही कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी सभेत दिले.

अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी होत्या. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती नीता चव्हाण, सुरेश धनके, सदस्य अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी, प्रभाकर सोनवणे, प्रभाकर जाधव, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, राजन पाटील, मीनल कुटे, सुनील दुसाने आदी उपस्थित होते.

धरणगावातच अधिक अनागोंदी

पाणी योजना प्रकरणात धरणगावमधील सर्वाधिक गावांमध्ये अनागोंदी झाली आहे. याच तालुक्यात एवढी अनागोंदी होते, पण कारवाई होत नाही. जि.प.प्रशासन आपले काम करीत नाही, असा आरोप सदस्यांनी केला.

पाणी योजना प्रकरणात दोषी असलेली मंडळी भाजपाशी संबंध असलेली आहे. ते मोकाट फिरतात. कारवाई करताना दबाव येतो का, अडचणी आहेत का, असे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. काही योजना तर जुन्या होत्या. त्या नवीन असल्याचे दाखविले, एवढी अनागोंदी असताना ठोस कारवाई होत नाही याबाबतही सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निधीसंबंधी अधिकारी नेमावा

जि.प.तर्फे नागरी सुविधा, जनसुविधा, सिंचन व इतर कार्यक्रमातून अनेक कामे झाली, पण बिले निघत नाहीत. मंत्रालयीन स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावले जावेत यासाठी जि.प.ने स्वतंत्र अधिकारी नेमावा व ही प्रकरणे, फायली मार्गी लावून घ्यावीत, अशी मागणी सदस्यांनी केली.

सामान्य प्रशासनबाबत नाराजी

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सीईओ व पदाधिकारी यांच्यातील समन्वयक आहे. प्रशासनाच्या समन्वय सभेत ते प्रलंबित व इतर मुद्दे सांगत असतात. तर स्थायी व सर्वसाधारण सभेत सभा सचिव असतात. पण या अधिका:यांतर्फे पदाधिकारी, सदस्यांसाठी सकारात्मक, अनुकूल काम होत नसल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

परिचर भरती रद्द करा

जि.प.च्या परिचर भरती प्रकरणी प्रसार माध्यमांमध्ये अनेक मुद्दे मांडले जात आहेत. या प्रकरणी पारदर्शक चौकशी करावी. तसेच प्रथम परिचर भरतीचा पेपर रद्द केला जावा, अशी मागणी अध्यक्ष प्रयाग कोळी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनकेंसह सदस्य अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी, प्रभाकर सोनवणे आदींनी केली. जो विद्यार्थी मोबाईलमधून कॉपी करताना सापडला त्याची सखोल चौकशी करावी व सत्य उजेडात आणावे, अशी मागणी सदस्यांनी केली.

निलंबन संशयास्पद

जि.प.ने पेपर फुटीचे प्रकरण किंवा कॉपीचा मुद्दा समोर आणणारे कर्मचारी तुषार माळी यांना निलंबित केले. पण लागलीच त्यांचे निलंबन मागे घेतले. यासंदर्भात जि.प.ची भूमिका संशयास्पद आहे. ज्याने चांगले काम केले त्याच्यावर कारवाई करणे योग्य नाही, असेही उपाध्यक्ष आमले, सदस्य सोमवंशी, कांडेलकर म्हणाले. या प्रकरणात जि.प.ची भूमिका योग्य नाही. बदनामी जि.प.ची होते. ती थांबवावी, अशी मागणी अध्यक्ष कोळी, उपाध्यक्ष आमले व इतर पदाधिका:यांनी करीत जाहीर नाराजी व्यक्त केली.

दलित वस्तींमधील कामांचे आगाऊ पैसे काढले, पण काम नाही

दलित वस्तींमध्ये कामासंबंधी 40 टक्के रक्कम आगाऊ ग्रा.पं.च्या खात्यावर टाकली जाते. या रकमा ग्रामसेवक व गटविकास अधिका:यांच्या सहीने निघतात. त्या काढल्या, पण काम कामेच सुरू झाली नाहीत. या प्रकरणात चौकशी करावी. ग्रामसेवकांसह, गटविकास अधिका:यांना जबाबदार धरावे, अशी मागणी कांडेलकर, सोमवंशी, प्रभाकर सोनवणे आदींनी केली.

शाळांची पाहणी करू, मग दुरुस्ती

यासंदर्भात प्रशासनाने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही.

त्यावर ज्या शाळांची अवस्था खराब आहे त्यांचीच दुरुस्ती करा. निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची समिती ज्या गावांमध्ये कामे मंजूर झाली त्या गावांमध्ये पाहणी करतील. जेथे गरज असेल तेथे दुरुस्तीसंबंधीची शिफारस पदाधिकारी करतील, असा निर्णय झाला.