शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकावर पाळत ठेऊन हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:45 IST

हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

ठळक मुद्देनाकाचे हाड फ्रॅक्चर, दुसरी घटना

जळगाव : शाळेतून दुचाकीने बाहेर जात असलेल्या आर.आर. विद्यालयातील शिक्षक गिरीश रमणलाल भावसार (वय ४५ रा. निवृत्तीनगर) यांना दोन तरुणांनी दुचाकी अडवून जबर मारहाण के ल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता विसनजी नगरात घडली. या हल्ल्यात भावसार यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.गेल्या महिन्यात आर.आर.च्या प्रवेशाव्दारजवळ किर्तीकुमार शेलकर नामक शिक्षकाला टवाळखोरांनी मारहाण केली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा याच विद्यालयातील शिक्षकाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. एकाच शाळेच्या शिक्षकांना टवाळखोरांकडून मारहाण होत असल्याने यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश भावसार हे आर. आर. विद्यालयात माध्यमिकच्या वर्गांना शिकवितात. आठवी व दहावीच्या वगार्ला समाजशास्त्र आणि मराठी विषय ते शिकवितात. नेहमीप्रमाणे गुरुवारी ते विद्यालयात आले. दुपारी शाळा सुटल्यानंतर ते आर. आर. विद्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले. विसनजी नगरातील जुन्या इंडोअमेरीकन हॉस्पिटलकडून जात असलेल्या रस्त्यावर महेश भोळे फुल भांडारजवळ मंदिरापाठीमागील बाजूस झाडाजवळ दोन तरुण भावसार यांची प्रतिक्षा करीत होते.भावसार येताच या दोघांनी काही अंतरापर्यत त्यांचा पाठलाग करत एका तरुणाने डावा हात धरुन त्यांच्या तोंडावर फायटर घातलेल्या हाताने मारहाण केली.यात दुचाकीवरुन तोल जावून भावसार खाली पडले. नागरिकांनी धाव घेवून त्याला उचलले व रक्तबंबाळ झालेल्या भावसार यांना एका बाजूला बसविले. गर्दी जमा होताच हल्लेखोर तेथून पसार झाले.हल्लेखोर सीसीटीव्हीत कैदभावसार यांच्यावर हल्ला झाला. त्या परिसरात दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. घटनेची माहिती मिळताच विद्यालयाचे शिक्षक एन. एल. सपकाळे, एन. आर.कुमावत, आर. एम. झंवर, के. टी.वाघ, आर. बी. महाजन, एल.जी.भारुडे, के. जी. सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भावसार यांना प्रारंभी जिल्हापेठ पोलीस स्टेशन व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून नाकाचे हाड मोडले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी भावसार यांच्यावर हल्ला झाला. त्या परिसरात दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. घटनेची माहिती मिळताच आर. आर. विद्यालयाचे शिक्षक एन.एल.सपकाळे, एन.आर.कुमावत, आर.एम.झंवर, के. टी.वाघ, आर.बी.महाजन, एल.जी.भारुडे, के.जी.सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भावसार यांना प्रारंभी जिल्हापेठ पोलीस स्टेशन व तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून नाकाचे हाड मोडले आहे. नाकातून रक्तश्राव थांबत नसल्याने शिक्षकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.हल्लयामागे नेमके कोण?गेल्या महिन्यात आर.आर.विद्यालयाचे शिक्षक किर्तीकुमार शेलकर यांना विद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळच भरदिवसा दोन तरुणांनी बेदम मारहाण केली होती. आता भावसार यांना मारहाण झाली आहे. सतत शिक्षकांना मारहाण होणे, एकाच टवाळखोर गटाचा वापर होणे यामागे नेमके कोण व कारण काय? आहे याबाबत आता उलटसुलट चर्चा होत आहे. संस्था व शिक्षकांच्या जुन्या वादातून तर मारहाण झाली नाही ना? अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे. दोन्ही घटनांमध्ये भीतीपोटी शिक्षकांनी पोलिसांनी तक्रार दिलेली नाही.दुसऱ्यांदा घटनेने दहशत... यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी आर.आर. शााळेच्या गेटजवळ किर्तीकुमार शेलकर या शिक्षकाला मारहाण झाली होती. दहशतीमुळे या शिक्षकाने तक्रार दिली नव्हती. आता पुन्हा हा प्रकार घडला. शिक्षकांवर हल्ला होत असताना ना पोलीस प्रशासन काही करत ना शाळेचे प्रशासन. हल्ल्याच्या सतत घडणाºया या घटनांमुळे शाळेतील शिक्षक वर्ग मात्र दहशतीत वावरत असल्याचेच लक्षात येते. या प्रकरात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा या निमित्त शिक्षण क्षेत्राकडून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी