शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे येथे पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या तलाठ्यास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:50 IST

पावसाने ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

भुसावळ, जि. जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शनिवारी भुसावळ तालुक्यातील कुºहे पानाचे येथे पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या तलाठ्यास संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घेराव घातला.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ५ लाख ५ हजार ८७७ शेतकऱ्यांचे ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी व शासनास सादर केला आहे. सर्वाधिक फटका जामनेर, चाळीसगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही अधिक म्हणजेच सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. २१ ते २९आॅक्टोबर या कालावधीत तर संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिवाळीच्या सुट््यांमुळे त्यात अडचण निर्माण झाली होती. अखेर बुधवारपासून पंचनामे सुरू झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवालही कृषी विभागाने सादर केला आहे.सर्वात कमी नुकसान रावेरमध्येतर सर्वात कमी नुकसान रावेर व बोदवड तालुक्यात झाले आहे. रावेर तालुक्यातील १२० गावांमधील १६ हजार ८३७ शेतकºयांचे १५ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर बोदवड तालुक्यात ५२ गावांमधील १७ हजार ४५६ शेतकºयांचे १८ हजार ३७१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.कोरडवाहूचे ४ लाख ६१ हजार हेक्टरचे नुकसानजिल्ह्यातील कोरडवाहू पिकांचे ४ लाख ६१ हजार १५९ हेक्टरचे तर बागायतीचे १ लाख ३६ हजार ८०४ हेक्टरचे व बहुवार्षिक पिकांचे १८६७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कोरडवाहू मध्ये खरीप ज्वारी ३८ हजार २८८ हेक्टर, कापूस ३ लाख १७ हजार ८९३ हेक्टर, मका ७७ हजार ३५६ हेक्टर, बाजरी ८ हजार ७६९ हेक्टर, सोयाबीन १७ हजार १०१ हेक्टर, तूर १११४ हेक्टर, तीळ ३ हेक्टर, भुईमूग ३०५ हेक्टर तर इतर पिके ३३० हेक्टर, बागायती पिकांपैकी चार पिके २३० हेक्टर, कापूस १ लाख २३ हजार ९८६ हेक्टर, ऊस ११७६ हेक्टर, भाजीपाला २२३३ हेक्टर, पपई २९९ हेक्टर, कांदा ३२८५ हेक्टर, केळी ५५९५ हेक्टर तर बहुवार्षिक पिके- १८६७ हेक्टरचा समावेश असल्याची माहिती मिळाली.जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील एकूण ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक ८५ हजार १६६ हेक्टरचे नुकसान जामनेर तालुक्यात झाले आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव तालुक्यात ७७ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव