शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

महास्वच्छता अभियानावेळी महापौरांसह आयुक्तांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले असून, सोमवारी शिवाजीनगरात अभियानाला सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले असून, सोमवारी शिवाजीनगरात अभियानाला सुरुवात करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी महापौरांसह मनपा आयुक्तांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. शिवाजीनगर, प्रजापतनगरात गटारींची स्वच्छता नियमित होत नसल्याने शिवाजीनगर भागातील नागरिकांनी महापौर व आयुक्तांना घेराव घालत मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच मनपा अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांची कानउघडणी करत दररोज साफसफाई करण्याच्या सूचना केल्या.

महास्वच्छता अभियानाच्या प्रारंभी महापौर सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बाल कल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, मनोज आहुजा, कांचन सोनवणे, सरिता नेरकर, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, प्रवीण कोल्हे, मंगेश जोहरे, भरत सपकाळे, उत्तम शिंदे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले आदींसह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिवसभरात उचलला ३०८ टन कचरा

सोमवारी ८७५ पैकी ७४० कर्मचारी हजर तर १३५ गैरहजर होते. त्यात १८ वैद्यकीय व अग्रीम रजेवर होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून ३०८ टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. प्रभाग १ ते ६ मधून तब्बल ३८ टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहिमेमुळे इतर प्रभागांत अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.

महापौरांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घेतले धारेवर

१. अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य निरीक्षकांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांवर वचक ठेवून काम करून घेतल्यास कुणाचीही ओरड राहणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

२.शिवाजीनगर परिसरात जवळपास ७५० खांब असून, त्यावर एलईडी बसविण्यात आले नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. गुरुवारपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येऊन २ दिवसांत काम पूर्ण करण्याचा सूचना महापौरांनी दिल्या.

३. हरिओमनगरात रेल्वे सुरक्षा भिंतीला लागून असलेला नाला साफ केला जात नसल्याने पाणी तुंबून डास, सापांचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौरांनी लागलीच सूचना देत नालेसफाईकामी जेसीबी उपलब्ध करून घ्यावे, असे सांगितले.

४. शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामासाठी खोदलेल्या चाऱ्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेल्या नसून खडी बाहेर येत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अमृतच्या नळ संयोजनची जोडणी झालेली असो किंवा नसो चाऱ्या दुरुस्ती तत्काळ करण्याचा सूचन दिल्या.

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा, दंड

महापौर भारती सोनवणे या सोमवारपासून महास्वच्छता अभियान राबविणार असल्याने गैरहजर राहू नये याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. सोमवारी मनपाच्या ४७५ कायम कर्मचाऱ्यांपैकी ४०३ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३३७ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ५४ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या, तर मक्तेदाराच्या ६३ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

पदाधिकाऱ्यांना करावा लागतोय संतापाचा सामना

शहरात रस्ते, स्वच्छता, गटारी व आरोग्याचा प्रश्न गंभीर होत जात असून, नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांचा विरोधात संताप पहायला मिळत आहे. याआधी उपमहापौर सुनील खडके यांच्या ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमातदेखील नागरिकांनी उपमहापौरांना घेराव घालत, प्रश्नांची सरबत्ती केली होती. आता महापौरांनाकडेही नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.