शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादा जैन विधानसभा निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:54 IST

जळगाव मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची माहिती तर्क-वितर्काना ‘ब्रेक’

जळगाव : गेल्या पाच वर्षात शहराची वाट लागली असून, शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आगामी विधानसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सोमवारी दिली. अनेक महिन्यांपासून सुरेशदादा जैन हे निवडणूक लढविणार की नाही ? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. अखेर त्याला आता विराम लागणार आहे.मनपाच्या सोळाव्या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्यांचा दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते. सुरेशदादा जैन यांनी गेल्या ५ वर्षाचा कालखंड सोडल्यास सलग ३५ वर्ष त्यांनी शहर व तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या पाच वर्षात जळगाव शहराचे अक्षरश: वाटोळे झाले असून, शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी व कार्यकर्त्यांचा आग्रहाखातर सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढविण्यास तयारी दर्शविली आहे.पदाधिकाऱ्यांकडून मनधरणीशहरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरेशदादा जैन यांनी आपण यंदा विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, सुरेशदादा जैन हे शिवसेनेच्या पहिल्या टॉप नेत्यांमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीत युतीलाच यश मिळणार असून सुरेशदादा जैन यांनीच शहराचे प्रतिनिधीत्व करावे अशी इच्छा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती. त्यानुसार माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, राजू अडवाणी, विजय वाणी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे व श्याम कोगटा या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरेशदादा जैन यांची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मनधरणी केली जात होती. अखेर शनिवारी झालेल्या बैठकीत सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढविण्यास होकार दिल्याची माहिती महाजन यांनी दिली.कुटूंबियांशी चर्चेनंतर निर्णयपदाधिकाºयांकडून निवडणूक लढविण्याबाबत आग्रह होत असल्याने सुरेशदादा जैन यांनी आधी कुटूंबियांशी चर्चा केली. कुटूंबियांनी पाठींबा दिल्यानंतरच सुरेशदादा निवडणूक लढण्यास तयार झाल्याचे महाजन यांनी सांगितले. सुरेशदादा हे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार असतील. निवडणुकीनंतर सहा महिन्यातच गाळे व हुडकोचा प्रश्न ते सोडवतील असेही महाजन म्हणाले.आपण आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असून, कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून यंदाची निवडणूक लढविण्याबाबत सारखा आग्रह होत असल्याने हा निर्णय आपण घेतला आहे.-सुरेशदादा जैन, माजी मंत्री

टॅग्स :Jalgaonजळगाव