शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सुरत येथील कारागिराने केली जळगावातील टॉवरवरील घड्याळाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:43 IST

जैन इरिगेशनचा पुढाकार

ठळक मुद्देचार महिने केले शर्थीचे प्रयत्नट्रकभर कचरा काढला

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले शास्त्री टॉवरवरील ब्रिटीशकालीन घड्याळ सुरत येथील अशोक विसपुते या कारागिराने चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर दुरुस्त केले असून यासाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेतला यामुळे टॉवरवरील या घड्याळाची टीक.. टीक जळगावकरांना पुन्हा अनुभवता येणार आहे.शास्त्री टॉवरवरील घड्याळ दुरूस्तीसाठी महापालिकेने प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आले नाही. टॉवरवरील घड्याळ वजनदार असून ते दहाव्या मजल्यावर असल्याने त्याच्या दुरूस्तीचे काम अतिशय जिकरीचे आणि आव्हानात्मकच होते.घड्याळाची चार मजल्यापर्यंत वाईडींग चेनटॉवरच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घड्याळाचे डायल १२ फुटांचे आहे. तर ५.५ फुट व ६ फुट लहान मोठे काटे आहेत. वाईडींग चेन ७२ फुट म्हणजे १२ मीटर, चार मजल्यापर्यंत जाईल एवढी आहे. घड्याळाला पॉवर देण्यासाठी चार प्लेट असून त्या सुमारे १८० ते २०० किलो वजनाच्या आहेत. घड्याळामध्ये पितळाचे व्हील असून यातील दोन व्हील तयार करण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागले. सुरत, मुंबई, बडोदा याठिकाणीहून घड्याळाचे सुटे भाग मागवावे लागले. दर आठ दिवसाने त्याला चावी द्यावी लागते त्यामुळे त्याच्या हाताळणीसाठी दोन जणांची नेमणूक करण्यात आली आहे.पुतळ्यावर लवकरच संगमरवरची छत्रीअतिशय महत्त्वाचा चौक म्हणून टॉवर चौकाकडे पाहिले जाते. बाहेरगावाहून येणारे आणि शहरातील नागरिक खरेदी करण्यासाठी याच चौकात येत असतात. सुशोभिकरणासाठी जैन इरिगेशनने हे टॉवर दत्तक घेतले आहे. त्यामुळे टॉवरच्या रंगरंगोटीचे काम जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच टॉवरच्या खाली असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याच्या मागे भिंत बांधून त्या ठिकाणी ‘लाल बहादूर शास्त्री टॉवर’ असे नाव टाकले जाणार आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यावर संगमरवरची छत्री लवकरच तयार केली जाणार आहे.देशातील महत्त्वाच्या ‘क्लॉक टॉवर’पैकी एक टॉवरघड्याळांचे मनोरे शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात उभे करण्याची संकल्पना ब्रिटिशांनी भारतात आणली. भारतातील महत्त्वाच्या क्लॉक टॉवरमध्ये मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर, घड्याळ गोदी, हुसेनाबाई क्लॉक टॉवर (लखनौ), चौरा बझार क्लॉक टॉवर (हैद्राबाद), देहरादून क्लॉक टॉवर, घंटा घर (मिर्झापूर), घंटा घर (जोधपूर), मिंट क्लॉक टॉवर (चेन्नई), क्लॉक टॉवर (म्हैसूर) यांचा समावेश आहे. अशाच महत्त्वाच्या टॉवरमध्ये जळगावचा उल्लेख केला जातो.ट्रकभर कचरा काढलाअशोक विसपुते यांनी वडील सदाशिव विसपुते यांच्याकडून घड्याळ दुरूस्तीचे प्रशिक्षण घेतले. टायटन सर्व्हिस सेंटरमध्ये काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच टॉवरवरील घड्याळ दुरूस्तीचे काम यशस्वी केल्याचे ते सांगतात. सुरुवातीला कबुतरांचे घरटे बनलेल्या या घड्याळाची स्वच्छता केली. त्यात ट्रकभर कचरा होता. अतिशय दणकट असलेले हे घड्याळ वाईडींग पद्धतीचे आहे. त्याला इलेक्ट्रीक पद्धतीत आणण्याचा प्रयत्न झाल्याने ते निकामी झाले. दुरुस्तीच्या वेळी विशेष पद्धतीचे ग्रीस वापरण्यात आल्याचे विसपुते यांनी सांगितले.जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा वसा जैन इरिगेशनने जपला आहे. भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यानासह शहराच्या सुशोभिकरणाच्या कार्यात महत्त्वाचे योगदान जैन इरिगेशनने दिलेले आहे. आता हे घड्याळ दुरुस्त करून जळगावच्या लौकिकात भर घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जैन इरिगेशनने पूर्ण केले आहे.टॉवर वरील हे घड्याळ ऐतिहासिक आहे. जळगाव शहराची शोभा वाढविणारे हे घड्याळ दुर्मिळ स्वरुपातील आहे. अशा दुर्मिळ गोष्टींचे आपण जतन करायला हवे. या सर्व वास्तु-वस्तुंमध्ये प्रत्येकाच्या भाव-भावना गुंतलेल्या असतात. जळगावकरांच्या भाव-भावना, संवेदना जोपासण्यासाठी जैन इरिगेशन नेहमी पुढाकार घेत असते. शास्त्री टॉवरवरील घड्याळाच्या दुरूस्तीचे कामही त्यातूनच करण्यात आले आहे.- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव.घड्याळ दुरूस्तीचा वसा वडिलांकडून मिळाला. माझ्या आयुष्यातील अनुभवपणाला लावून आव्हानात्मक घड्याळ दुरूस्तीचे काम पूर्ण केल्याचे समाधान आहे. दहाव्या मजल्यावर चढूुन दुरूस्ती करताना अडचणी आल्यात, मात्र जिद्द ठेवून घड्याळ दुरूस्त केले.- अशोक विसपुते, घड्याळ दुरूस्त करणारे कारागिर, सुरत 

टॅग्स :Jalgaonजळगाव