आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.८ : सुरत रेल्वे गेटला जोडणारा रस्ता समांतर करण्यासाठी तसेच जळगाव-सुरत दरम्यान टाकलेल्या नवीन रेल्वे मार्गाच्या लेव्हलिंगसाठी ८ रोजी रात्री १० ते ९ रोजी सकाळी ६ पर्यंत आठ तास रेल्वे गेट बंद राहणार आहे़ तर शिवाजीनगर पूल अवजड वाहतुकीसाठी बंद आहे, त्यातच एकमेव पर्यायी सुरत रेल्वे गेट बंद राहणार असल्याने या मार्गाने जाणाºया चारचाकी वाहनधारकांचे हाल होणार आहे़जळगाव- सुरत रेल्वे मार्गावरील दूध फेडरेशन समोरील सुरत रेल्वे गेट नं १४८ हे याठिकाणी दूध फेडरेशनच्या बाजूने गेटला जोडला जाणारा रस्ता ओबडधोबड असल्याने हा रस्ता गेटशी समांतरीत करण्याचे काम केले जाणार आहे़ तसेच जळगाव-सुरत नवीन रेल्वे लाईन दुरुस्ती तसेच तपासणीचे काम करण्यात येणार आहे़ या कामासाठी रेल्वे गेट बंद करण्यात येणार असून वाहनधारकांना होणाºया त्रासाबद्दल रेल्वे दिलगीर असल्याचे मध्य रेल्वेचे निर्माणचे उपमुख्य अभियंता रोहित थावरे निवेदनात म्हटले आहे़शिवाजीनगर, विदगाव, कानळदा, आव्हाणे, यावल व चोपडा या गावांकडे जाणाºया चार चाकी वाहनांचा सुरत रेल्वे गेटचा एकमेव पर्याय आहे़ मात्र हेच गेट ऐन रात्री बंद राहणार असल्याने या मार्गाने जाणाºया चारचाकी वाहनधारकांचे हाल होणार आहे़ तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलावरून दुचाकींधारकांच्या संख्येत वाढ होऊन पुलाच्या वाहतुकीवर ताण पडणार आहे़
जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेट रात्री १० पासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:15 IST
सलग आठ तास दुरुस्ती होणार असल्याने चारचाकी वाहनधारकांचे होणार हाल
जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेट रात्री १० पासून बंद
ठळक मुद्देशिवाजीनगर पूल अवजड वाहतुकीसाठी बंदचारचाकी वाहनधारकांचे होणार हालसुरत रेल्वे गेटला जोडणारा रस्ता समांतर करण्यासाठी राहणार गेट बंद