शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात दात्यांनी दिला गरीब शालेय विद्यार्थ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 18:42 IST

धरणगावात बूट, मोजे व कपड्यांचे वितरण

धरणगाव, जि.जळगाव : समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने व दातृत्वाच्या भावनेतून काही अज्ञात दात्यांनी धरणगावातील गरीब विद्यार्थी व बालकांना मायेचा आधार दिला. विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासह आवश्यक असलेले बूट, मोजे देण्यात आले. विशेष म्हणजे मोठ्या स्वरुपाचा आर्थिक खर्च करूनही दात्यांनी आपली नावे समाजासमोर उघड करण्यास इन्कार केला.धरणगावातील सर्वात जुनी व एकमेव असलेली मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आर.एन.महाजने होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, प.रा.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, अ‍ॅड.संजय महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, नगरसेविका संगीता मराठे, विजय वाघमारे, पोलीस पाटील संघटनेचे पांडरंग सातपुते उपस्थित होते.या शाळेतील गरीब ३५ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासह आवश्यक असलेले बूट व मोजे मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले.यावेळी सर्वच मान्यवरांनी या सामाजिक कार्याचा आपल्या भाषणात गौरवास्पद उल्लेख केला. तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी विद्यार्थ्यांना कुठलीही मदत लागत असल्यास हक्काने सांगण्याची विनंती शालेय प्रशासनाला केली. मुख्याध्यापक पी.जी.पाटील यांनी विद्यार्थ्यांतर्फे कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे, अरविंद ओस्तवाल, प्रल्हाद पाटील, चंदू मराठे, योगेश वाघ, राहूल मराठे, कल्पेश महाजन यांनी परिश्रम घेतले.मदतीचा अनोखा आदर्शसाधारणपणे कुणीही कुणाला मदत केली तर संबंधित व्यक्ती किंवा संघटना आपापला गौरव करून घेत असतात. परंतु मोठ्या प्रमाणातील आर्थिक मदतीनंतरही दात्यांनी आपल्या नावाचा कुठेच उल्लेख होणार नाही किंवा आपले नाव कुठल्याही पद्धतीने समोर येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी अज्ञात दात्यांबद्दल गौरवोद्गार काढत त्यांचे कौतुक केले. 

टॅग्स :Educationशिक्षणDharangaonधरणगाव