शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुनेच्या साथीने ‘ती’नं लढायचं ठरवलं अन् मोठ्या संकटांना हरवलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 12:18 IST

लढवय्या महिलेची डोळ्यात पाणी आणणारी अन् लढायला शिकवणारी कथा, पती अंथरुणावर, मुलाचा अपघाती मृत्यू

सचिन पाटील  जळगाव : पतीला लकव्याचा धक्का बसला. पतीच्या उपचारासाठी तिनं राहतं घर विकलं अन् तिच्या आयुष्याचा चित्रपट सुरु झाला, आज ती संसारात उभी आहे अन् पहाटेपासून सायंकाळपर्यंत काबाडकष्ट करू दैवाशी अन् संकटाशी झगडते आहे. एखादी महिला आयुष्यात ताकदीने उभी राहिली तर तिच्यासमोर सारी संकटंही जणू नतमस्तक होतात, हेच या महिलेने स्वत:च्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे.यावल तालुक्यातील पाडळसे गावातील पुष्पा दिनकर पाटील (६०) असं तिचं नाव. नेहरूनगरात एक चहाची टपरी आहे. पती अन् मुलासोबत तिचं आयुष्य सुखी होतं. पण दहाएक वर्षापूर्वी तिच्या पतीला लकवा झाला अन् संकटे सुरु झाली. तिनं तिचं गावातील राहतं घर विकलं अन् ती शहरात रहायला आली, भाड्याने खोली घेतली. तिच्या मुलाला एव्हाना एका कंपनीत छोटी नोकरीही मिळाली होती. मुलाचं लग्न झालं. पतीही हळूहळू बरा होत होता.आयुष्याची विस्कटलेली घडी आता इस्त्री केलेल्या कपड्यासारखी पुन्हा व्यवस्थित होतेय, असं तिचं मन तिला सांगत होतं. पण ते खोटं होतं अजून खूप काही तिला पहायचं होतं. तिच्या पतीला पुन्हा लकव्याचा त्रास सुरु झाला. तिची सून गरोदर होती. एकीकडे आनंद अन् दुसरीकडे पतीच्या आजाराचा तणाव अशा व्दिधा परिस्थितीत ती होती. पण तिच्या आयुष्याची कथा इथं संपत नाही.सून गरोदर होती, तेवढ्यातच तिच्या मुलाचा जोरदार अपघात झाला, अन् तिच्या मनावर आणखी एक घाव बसला. तिच्या मुलाचं निधन झाले. नियती पण किती क्रूर असते बघा, तिच्या मुलाच्या निधनानंतर सहा दिवसातच तिच्या सुनेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.मुलगा इहलोकी गेला अन् उत्पन्नाचं मोठं टेन्शन उभं राहिलं, घरात कुणीच कमावता नाही. घराचे भाडे, रोजचा खर्च, नुपूर व तन्मय ही नातवंडंही शाळेत जाऊ लागली होती, त्यांचा खर्च अन् जोडीला पती लकव्याने आजारी. त्याच्या आजारपणावर होणारा खर्च. हा सारा खर्च कसा पेलवायचा? असा प्रश्न उभा राहिला.तिनं ठरवलं, हरायचं नाही अन् रडायचं तर नाहीच नाही, उभं रहायचं. सुनेला घेतलं अन् तिनं मनाशी ठरवलं. तिने नेहरूनगरात एक चहाची टपरी टाकली. पहाटे ४.३० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत कशाचीही पर्वा न करता तिने चहाचा व्यवसाय केला अन् हळूहळू घर मानसिकदृष्ट्या सावरलंं नसलं तरी आर्थिकदृष्ट्या सावरू लागलं. बुध्दीमत्तेच्या जोरावर नोकरी मिळवणं खूप सोप्पं असेल कदाचित पण संकटाच्या चक्रव्यूहात उभं असताना तो भेदून मनाचा दगड करून उभं राहणं, किती अवघड असतं, हे या महिलेच कथेवरून दिसून येते.हक्काचं घर-दार नव्हतं, होतं ते पतीसाठी विकून टाकलं अन् शून्य होऊन ती जळगावात आली, पण तिला इथं देवमाणसं भेटली. कुणी तिला आर्थिक मदत केली. घरमालकाने तिच्याकडे कधीही भाड्यासाठी तगादा लावला नाही, त्यामुळे आपण आयुष्यात उभं राहू शकल्याचे त्या आवर्जून सांगतात.सासू-सुनेचं नातं मायलेकीपेक्षाही उजवेसासू-सुनेचं नातं म्हटलं की, घरात भांड्याला भांडं जास्तच लागतं. पण या घरात सासू-सुनेचं नातं हे मायलेकीपेक्षाही उजवं राहिलं. दुर्दैवाने सुनेलाही आई-वडिल नाहीत. त्यामुळे पतीच्या निधनानंतर सासू सासऱ्यांमध्येच आपले आईवडिल पाहिले अन् ती सासऱ्यांची सेवा करू लागली अन् सासूबार्इंना मदत करू लागली.

टॅग्स :Jalgaonजळगाव