शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

वॉटरग्रेसमध्ये सुनील झंवर भागीदार असतील, मात्र गिरीश महाजन यांचा संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:11 IST

जळगाव : बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी संशयित असलेले सुनील झंवर यांच्याकडे वॉटरग्रेस कंपनीशी संबंधित कागदपत्रे सापडणे यात त्या दोघांची ...

जळगाव : बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी संशयित असलेले सुनील झंवर यांच्याकडे वॉटरग्रेस कंपनीशी संबंधित कागदपत्रे सापडणे यात त्या दोघांची भागीदारी (पार्टनरशीप) असू शकते, मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असा दावा भाजपच्यावतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. जेथे वॉटरग्रेस तेथे गिरीश महाजन असा संबंध जुळवून कोणाचे नाव गोवणे चुकीचे आहे, असाही दावा भाजपने केला आहे. कोणाची मैत्री, ओळख असू शकते, मात्र त्यात झंवर आहे, म्हणून महाजनही असतील, असे होत नाही, असेही भापचे म्हणणे आहे.

बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सुनील झंवर यांच्याकडे तपासणी केली असता तेथे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्ले सापडण्यासह सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीचेही काही कागदपत्रे सापडले. त्यामुळे वॉटरग्रेसशी झंवर यांचा संबंध जोडला जात आहे. या सोबतच मनपातर्फे देण्यात येणारा साफसफाईचा ठेका भाजपची सत्ता आल्यानंतरच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटच्या लोकांची जवळीक असलेल्या वॉटरग्रेसला देण्यात आल्याची चर्चा आहे. जिथे जिथे भाजपची सत्ता आली व गिरीश महाजन यांचा संपर्क आला त्या नाशिक, जळगाव पाठोपाठ धुळ्यातही सफाईचा मक्ता वॉटरग्रेसलाच देण्यात आला. सत्तेच्या जोरावर अधिकाऱ्यांना हाताशी धरून चांगले काम न करताही भरमसाठ बिल काढून कमाई करण्यात येत असल्याचा आरोप या सर्वच ठिकाणी विरोधकांकडून होत आहे.

या संदर्भात ‘लोकमत’ने ५ डिसेंबर रोजी सत्ताधाऱ्यांना भागीदार करण्याची मोडस ऑपरेंडी, दिली जाणार रक्कम यामुद्द्यांसह सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर भाजपने रविवार, ६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. या पत्रकार परिषदेला आमदार भोळे, सोनवणे यांच्यासह महापौर भारती सोनवणे, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डाॅ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते.

ठेका देण्याचा प्रशासनाचा निर्णय

वॉटरग्रेस कंपनीला अगोदर भाजपचा विरोध होत असताना नंतर सफाईचा ठेका याच कंपनीला कसा दिला गेला, या विषयी आमदार भोळे म्हणाले की, कंपनीच्या कामकाजामध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे त्याला विरोध केला. त्यानंतरही मनपा प्रशासनाने ठेका देण्याचा निर्णय घेतला असे सांगत आता सत्ताधारी भाजप अथवा गिरीश महाजन यांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे आमदार भोळे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. असे झाले नसते तर चार प्रभागात चार स्वतंत्र सफाईचे ठेके देण्याचा विचार होता, असेही या वेळी सांगण्यात आले. मात्र असले तरी प्रशासनावर खापर फोडून भाजप यातून हात झटकू पाहत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

अनेक ठिकाणी वॉटरग्रेस, तेथे महाजन नाही

वॉटरग्रेसशी महाजन यांचा संबंध जोडला जात असला तरी केवळ जळगाव, धुळे, नाशिक येथेच नाही तर औरंगाबाद, मुंबई, भिवंडी, अंबरनाथ, दिल्ली, रांची, लखनऊ इतकेच नव्हे तर विदेशात युगांडा येथेही वॉटरग्रेसचा ठेका आहे तेथे महाजन कोठे आहे, असे भाजपने म्हटले आहे.

जो करेल तो भरेल

बीएचआर प्रकरणाची चौकशी होत आहे. त्यात जे समोर येईल त्यानुसार कारवाई होईलच. झंवर त्यात सापडले, त्याला काय व्हायचे ते होईल व जो करेल तो भरेल, असे भाजपचे आता म्हणणे आहे. मात्र महाजन यांचा यात काहीही हात नसल्याचेही सांगण्यात आले.

आता चूक झाल्यास ठेका रद्द

वॉटरग्रेसला विरोध करणाऱ्या सत्ताधारी भाजप कंपनीच्या कामावर समाधानी आहे का, या विषयी मात्र गोलमाल उत्तर देण्यात आले. एकतर कंपनीकडे कामगार कमी आहे. मात्र आता ते सफाई करीत असल्याने नागरिकांच्या तक्रारीदेखील नाही, असेही भाजपचे म्हणणे असून ठेकेदाराशी वाद होऊन आपल्यावर गुन्हेदेखील झाले असल्याचे कैलास सोनवणे यांनी सांगितले. मात्र आता ठेकेदाराने चूक केल्यास त्याचा ठेका रद्द करण्यात येईल, तसे त्याच्याकडून लिहूनदेखील घेतले आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावे

वॉटरग्रेसला ठेका देण्यासाठी कंपनीकडून नगरसेवकांना ‘पाकीट’दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या विषयी कैलास सोनवणे म्हणाले की, ठेका देण्यासाठी भाजपला रस नव्हता. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावे, असे आव्हाण दिले.

उपमहापौरांचे नव्याचे नऊ दिवस

सफाईविषयी तक्रारी नसल्याचे भाजपचे म्हणणे असले तरी गेल्या काही दिवसांपासून उपमहापौर सुनील खडके हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या तक्रारी असल्याचे सांगत आहे. या विषयी मात्र भाजपनेच हात वर करीत उपमहापौर यांचे हे नव्याचे नऊ दिवस असल्याचे आमदार भोळे म्हणाले. खड्डे आताच पडले का, असे सवाल करीत आपल्याच पक्षातील उपमहापौरांच्या तक्रारींविषयी शंका उपस्थित करण्यात आली.

आठवडाभरात शहरातील रस्ते दुरुस्तीस सुरुवात

शहरातील सफाई व रस्त्यांविषयी तक्रारी असल्याचे उपमहापौरांचे म्हणणे असले तरी मार्चपर्यंत अमृत व इतर कामे सुरू राहणार असल्याने रस्ते आताच करणे शक्य नाही. मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४६ कोटींच्या निविदा काढल्या असून आठवडाभरात या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

रस्ते, गाळे या दोन प्रश्नांना प्राधान्य

शहरातील रस्त्याची समस्या आहे, या विषयी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र मनपा कर्जमुक्त झाली, हे मोठे यश आहे. आता रस्ते व गाळे हे प्रश्न मार्गी लावणे याला प्राधान्य राहणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. मार्च पर्यंत शहरवासीयांना २४ तास पाणी मिळेल, असा दावाही भोळे यांनी केला. भाजप सरकारकडून ४२ कोटी मंजूर झाले होते. ते महाविकास आघाडी सरकारने रोखून धरले आहे. त्यामुळे विरोधक टीका करीत असले तरी त्यांनी हा निधी आणावा, रस्त्यांच्या कामासाठी पुढाकार घ्यावा, असे आव्हानही आमदार भोळे यांनी दिले.

पत्रकार परिषदेत संभ्रम

पत्रकार परिषद नेमकी कोणत्या विषयासाठी आहे, हे येथे मांडण्यात आलेल्या विविध विषयांवरून स्पष्ट होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र या वेळी दिसून आले. सुरुवातीला कार्यकर्ता कार्यशाळा यशस्वी झाल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. मात्र नंतर वॉटरग्रेस, शहरातील रस्ते, पाणी, निविदा असे वेगवेगळे विषया एकत्र आले.