सुनील झंवर, कंडारेच्या घरांसह शहरात डकविल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:42+5:302021-02-13T04:17:42+5:30

जळगाव : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात पोलिसांना मिळून येत नसलेले तत्कालिन अवसायक जितेंद्र ...

Sunil Zanwar, notices posted in the city along with Kandare's houses | सुनील झंवर, कंडारेच्या घरांसह शहरात डकविल्या नोटिसा

सुनील झंवर, कंडारेच्या घरांसह शहरात डकविल्या नोटिसा

Next

जळगाव : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात पोलिसांना मिळून येत नसलेले तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून न्यायालयाच्या आदेशाने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या घरासह, न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार शहर पोलीस स्टेशन व काव्यरत्नावली चौक आदी ठिकाणी नोटिसा डकविल्या आहेत.

पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह ग्रामीणमधील दोन अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबाबत बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. ठाकरे, जैन, सांखला, वाणी व कंडारेचा चालक यांना अटक झाली आहे. त्यानंतर सुनील झंवरचा मुलगा सूरज यालाही अटक झालेली आहे. कंडारे व झंवर मात्र दोघही गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. दोघांविरुध्द वारंटही काढण्यात आले होते, तरी देखील ते हजर झाले नाहीत. त्यामुळे या दोघांना फरार घोषित करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू करण्यात आली. सरकार वकिलांनी त्यासंदर्भात गेल्या आठवड्यात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, त्यावर पुणे विशेष न्यायालयाचे न्या. एस.एस. गोसावी यांनी १० मार्चपर्यंत न्यायालयात हजर व्हा, अन्यथा फरार घोषित केले जाईल, असा इशारा वजा आदेशच दिला. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नन्नवरे व सहकारी यांचे पथक गुरुवारी शहरात आले होते. त्यांनी कंडारे याचे शिवाजी नगरातील संभाजी चौकातील घर, सुनील झंवर याचे सुहास कॉलनी, जय नगरातील साई बंगला, शहर पोलीस ठाणे, न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार व काव्यरत्नावली चौकात या नोटिसा डकविल्या आहेत.

Web Title: Sunil Zanwar, notices posted in the city along with Kandare's houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.