शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा पीपल्स को आॅप बँकेची रविवारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:10 IST

पाचोरा पीपल्स को.आॅप.बँकेची १२ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

ठळक मुद्दे१५ जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात प्रचार अंतिम टप्प्यातदोन पॅनलमध्ये चुरशीची लढत

पाचोरा, जि.जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तार असलेल्या दि पाचोरा पीपल्स को.आॅप.बँकेची १२ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होत असून, कोण बाजी मारतो हे मतदानानंतरच ठरणार आहे. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत १५ जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वसाधारण गटात पॅनल उमेदवारांशिवाय अनिल येवले व विलास अहिरे या २ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून, उर्वरित जागांसाठी सरळ लढत होणार आहे.सर्वसाधारण मतदारसंघाच्या १० जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असून माजी चेअरमन अशोक संघवी यांच्या नेतृवातील पॅनलमध्ये अशोक संघवी यांच्यवसह चंद्रकांत लोडाया, अल्पेश संघवी, सुभाष राका, सुशील मराठे, डॉ.जाकीर देशमुख, चंद्रकांत येवले, किशोर संचेती, शरद पाटील, सुरेंद्र बाफना हे तर अतुल संघवी यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनलमध्ये अतुल संघवी यांच्यासह प्रशांत अग्रवाल, जीवन जैन, देवेन कोटेचा, अनिल बोहरा, शरद पाटे, स्वप्नील पाटील, प्रकाश पाटील यांच्यात लढत होणार आहे .इतर मागास प्रवर्ग मतदार संघाच्या १ जागेसाठी सुभाष नावरकर व भागवत महालपुरे यांच्यात सरळ लढत होईल. महिला राखीव मतदारसंघाच्या २ जागांसाठी तारा देवरे, विद्याब् पाटील, डॉ.अस्मिता पाटील, मयुरी बिल्दीकर यांच्यात लढत होत आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून प्रवीण ब्राह्मणे व अविनाश भालेराव यांच्यात सरळ लढत होत आहे. भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून राजेंद्र राठोड व विकास वाघ यांच्यात लढत होत आहे .मागीलवर्षी सत्ताधारी ८ संचालकांनी चेअरमन अशोक संघवींविरुद्ध बंड करून राजीनामे दिल्याने अल्पमतातील सत्ता बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त झाले. वर्षभरानंतर निवडणूक लावण्यात आली. यामुळे साऱ्या तालुक्याचे लक्ष ह्या निवडणुकीकडे लागून आहे.१२ जानेवारी रोजी होणार मतदान आहे. पाचोरा येथे गो से हायस्कूलमध्ये मतदान होत असून नगरदेवळा, शेंदुर्णी, जामनेर, जळगाव, भडगाव ह्या ठिकाणी मतदान होत असूनश एकूण ९ हजार ६१० सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPachoraपाचोरा