आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : एप्रिल महिना सुरु व्हायला अजून तीन दिवस बाकी असतानाच मार्च अखेरीसच जळगावच्या तापमानाने चाळीशी ओलांडली असून, बुधवारी शहराचा पारा ४२ अंशापर्यंत पोहचला. २०१५ नंतर पहिल्यांदाच जळगावच्या तापमानाने मार्च महिन्यात ४२ अंशाची मजल गाठली आहे. दरम्यान, आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या आठवड्याभरापासून जळगावसह महाराष्टÑात उष्णतेची लाट पसरली आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर दिसून येत असून, दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत. सकाळी ११ पासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यांवर सामसूम दिसून येत आहे. नागरिक सायंकाळी ६ वाजेनंतरच घराबाहेर निघत आहेत.जळगावाचा पारा मार्च मध्ये सरासरी ३९ अंशापर्यंत कायम असतो. २०१० मध्ये शहराचा पारा मार्च महिन्यात ४२ अंशापर्यंत पोहचला होता. त्यानंतर २९ मार्च २०१५ रोजी शहरात ४२.४ अंशाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २८ मार्च, बुधवारी ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. स्कायमेट व भुसावळ वेलनेस वेदर या संकेतस्थळावरुन ही नोंद घेण्यात आली आहे.शहराच्या कमाल तापमानाप्रमाणेच किमान तापमानातही वाढ झाली असून, बुधवारी २१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे रात्री १० वाजेपर्यंत वातावरणात उकाडा जाणवत आहे.तापमान वाढीसह वाऱ्यांचा वेग देखील जास्त असल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा देखील बसत आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून १६ किमी प्रती तास या वेगाने वारे वाहत आहेत. तसेच वातावरणातील आर्द्रता देखील ५२ टक्कयांवर आली आहे.गेल्या आठवड्याभरापासून गुजरात, राजस्थानकडून येणाºया ‘लु’ वाºयांचे प्रमाण वाढल्यामुळे तापमानात सारखी वाढ होत आहे. तसेच अजुन आठवडाभर ‘लु’ वाºयांचा प्रकोप कायम राहणार असल्याने तापमानाचा पारा ४४ अंशापर्यंत जाण्याचा आंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगावात उन्हाचा रेकॉर्डब्रेक तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:20 IST
जळगावात तीन वर्षात मार्चमध्ये पहिल्यांदाच पारा ४२ अंशावर
जळगावात उन्हाचा रेकॉर्डब्रेक तडाखा
ठळक मुद्देजळगावात आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणारजळगावात किमान तापमानातही वाढ२०१० व २०१५ मध्ये मार्च महिन्यात होता पारा ४२ अंशावर